Anil Ghanwat
Anil Ghanwat Agrowon
ताज्या बातम्या

Soybean Vaydebandi : वायदेबंदी विरोधात सेबीसमोरील आंदोलनाला अनेक संघटनांचा पाठिंबा

Team Agrowon

स्वतंत्र भारत पार्टीने (Swatantra Bharat Party) जाहीर केलेल्या सेबीच्या (SEBI) कार्यालयासमोर धरणे आंदोलनास अनेक संघटना पाठिंबा देत आहेत. शेतीमलावर घातलेल्या वायदेबंदीला (Agriculture Produce Vayadebandi) विरोध करण्यासाठी हजारो शेतकरी धरणे आंदोलनात सहभागी होणार असल्याची माहिती स्वतंत्र भारत पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष, अनिल घनवट (Anil Ghanwat) यांनी दिली आहे.

सन २०२२ मध्ये अनेक शेतीमालाच्या वायदे बाजारातील व्यापारावर सेबीने बंदी घातली होती. डिसेंम्बर मध्ये ही मुदत संपणार होती व नवीन वर्षात शेतीमालाचे वायदे सुरू होतील अशी अपेक्षा होती.

मात्र सेबीने गहू, तांदूळ, चना, मूग, सोयाबीन व त्याचे उपपदार्थ, मोहरी व त्याचे उपपदार्थ आणि पमतेल या शेतीमलांवरील वायदेबंदीस डिसेंम्बर २०२३ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. या निर्णयामुळे शेतीमालाचे भाव पडले आहेत व त्याचा थेट आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसतो आहे.

या कारवाईचा निषेध करत स्वतंत्र भारत पार्टीने वायदेबंदी मागे घेण्याची सेबीला विनंती केली होती. मात्र एक महिना होऊन ही सेबीने काहीच प्रतिसाद न दिल्यामुळे आंदोलन करण्याची वेळ आली आहे.

आंदोलनातील सर्व मागण्या शेतकरी हिताच्या आहेत व त्या मान्य असल्यामुळे शेतकरी संघटना (शरद जोशी), शेतकरी संघटना (रघुनाथ दादा), किसानपुत्र आंदोलन, व अनेक शेतकरी उत्पादक कम्पन्यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे व सक्रिय सहभाग घेणार आहेत.

शेतकरी संघटनेचे अध्यक्ष ललित बहाळे, माजी आमदार वामनराव चटप, स्व. भा. पार्टीचे प्रदेशाध्यक्ष, मधुसूदन हरणे, स्व. भा. पार्टीच्या महिला आघाडी प्रदेशाध्यक्षा, सीमाताई नरोडे, पुणे शहर अध्यक्ष, महेश गजेंद्रगडकर, अमित सिंग आदी नेते आंदोलनाचे नेतृत्व करतील.

महाराष्ट्रभरातून हजारो शेतकरी दि. २३ जानेवारी रोजी बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स येथील सेबी कार्यालयासमोर होणाऱ्या आंदोलनात सहभागी होणार असल्याची माहिती स्वतंत्र भारत पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष, अनिल घनवट यांनी प्रसिद्धीस दिली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

Agrowon Podcast : मक्याला काय भाव मिळतोय? कापूस, सोयाबीन, गहू, टोमॅटो यांचे दर काय आहेत?

Sugar Quota : मे महिन्यात साखरेचा कोटा वाढला, घाऊक बाजारात मंदीची लाट

SCROLL FOR NEXT