Raju Shetty Agrowon
ताज्या बातम्या

Raju Shetty : कारखान्यांचे वजनकाटे तातडीने ऑनलाइन करा

राजू शेट्टी यांची वैधमापन नियंत्रक सिंघल यांच्याकडे मागणी

Team Agrowon

ॲग्रोवन वृत्तसेवा
कोल्हापूर : राज्यातील सर्व साखर कारखान्यांचे (Sugar Factory ) वजनकाटे तातडीने ऑनलाइन करा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (Raju Shetty ) यांनी राज्याचे अतिरिक्त पोलिस महासंचालक आणि वैधमापन नियंत्रक डॉ. रवींद्रकुमार सिंघल यांच्याकडे केली. यावर साखर कारखान्यांचे वजनकाटे संगणकीय

प्रणाली एकत्र करून तातडीने ऑनलाइन करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित विभागाला दिले.
राज्यात यंदाचा उसाचा गळीत हंगाम सुरू झाला आहे. अनेक साखर कारखान्यांकडून उसाची सर्रास काटामारी होत आहे. या पार्श्वभूमीवर शेट्टी यांनी डॉ. सिंघल यांची मुंबई येथे भेट घेऊन त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली.

या वेळी शेट्टी म्हणाले की, उसाच्या वजनात मोठ्या प्रमाणात तफावत येत असल्याने शेतकऱ्यांची प्रचंड मोठी लूट सुरू आहे. महाराष्ट्रात सुमारे ३५ लाख ऊस उत्पादक शेतकरी आहेत. त्यांच्यासाठी उसाचे वजन काटे हे विश्वासार्ह व अचूक असणे आवश्यक आहे. वजन काट्यामध्ये पारदर्शकता नसल्याने वजनात मोठी तफावत येते. खासगी काट्यावर वजन केलेला ऊस साखर कारखानदार नाकारत असल्याच्या तक्रारी येतात. शेतकऱ्यांना पावत्या दिल्या जात नाहीत.

त्यासाठी आपण या विषयाकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांच्या या तक्रारींचे गांभीर्य पाहता वैधमापन विभागाकडून यावर त्वरित कार्यवाही होऊन साखर कारखान्यांच्या वजन काट्यांचे कॅलिब्रेशनमध्ये एकसमानता, सुसूत्रता व पारदर्शकता राहण्याकरिता सर्व वजन काट्यांची कार्यन्वयिन संगणक प्रणाली एकच असणे व त्याचे कॅलिब्रेशन नियंत्रण वैधमापन विभागाकडून व्हावे, यासाठी तातडीने निर्णय घेणे गरजेचे आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Banana Farmer Issue: केळी उत्पादक तोट्यात

Agri Solar Pump: सौर कृषी पंपांसाठी कंपनीकडून निकृष्ट दर्जाचा साहित्य पुरवठा

Fragmentation Act: तुकडेबंदी उल्लंघन प्रकरणांसाठी शोधमोहीम

Farmer Compensation: भरपाईची ८७ हजार शेतकऱ्यांना प्रतीक्षा

Shaktipeeth Expressway: ''मोठ्या कंपन्यांना टेंडर देण्यासाठी...'' 'शक्तिपीठ'वरून राजू शेट्टी आक्रमक, मुख्यमंत्री फडणवीसांवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT