Tembhurani Weather News : पहाटे हिवाळा आणि दुपारी उन्हाच्या झळा असे वातावरण सध्या आहे. त्यामुळे शेतशिवारातील मका पिकावर (Maize Crop) या बदलत्या वातावरणाचा (Change In Weather) परिणाम सध्या होऊ लागला आहे.
जाफराबाद तालुक्यातील टेंभुर्णी परिसरात गेल्या पावसाळ्यात मुबलक पाऊस पडला. त्यामुळे विहिरी पाण्याने तुडुंब भरले आहेत.यामुळे यंदा अनेक शेतकऱ्यांनी खरीप हंगाम, रब्बी हंगाम (Rabi Season) यानंतर उन्हाळ्यातही मका पीक घेण्याचे नियोजन केले.
काही शेतकऱ्यांनी उन्हाळी मकाची ही मोठ्या प्रमाणावर लागवड केली आहे. परंतु सद्यःस्थितीत पहाटे हिवाळा तर दुपारी उन्हाच्या झळा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे उन्हाळी मका पिकाला फटका बसत आहे.
शेतकऱ्यांना पिकांना पाणी देण्यासाठी अतिरिक्त कष्ट घ्यावे लागत आहे. याशिवाय इतर पिकांवरही बदलत्या वातावरणाचा परिणाम जाणवत आहे.
शेतशिवारात सद्यःस्थितीत मकाचे पीक डोलत आहे. मात्र उन्हामुळे पिके सुकत आहेत. आठवड्यातून दोन ते तीन वेळेस पिकाला पाणी द्यावे लागत आहे.संतोष पवार, शेतकरी, टेंभुर्णी
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.