Gram Panchayat Elections  Agrowon
ताज्या बातम्या

Gram Panchayat Election : सात ग्रामपंचायतींवर महिलाराज

तालुक्यातील १७ ग्रामपंचायतींची निवडणूक जाहीर झाली असून, १७ सरपंच व १३५ सदस्यांसाठी १८ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे.

Team Agrowon

नांदगाव खंडेश्वर, अमरावती : तालुक्यातील १७ ग्रामपंचायतींची निवडणूक (Gram Panchayat Election) जाहीर झाली असून, १७ सरपंच व १३५ सदस्यांसाठी १८ डिसेंबर रोजी मतदान (voting) होणार आहे. तथापि, १७ ग्रामपंचायतींपैकी सात ग्रामपंचायती महिलांसाठी (Women) आरक्षित असल्याने त्याठिकाणी महिलाराज येणार आहे. यासाठी मतदारांच्या भेटीगाठी घेणे सुरू झाले असून, गावपुढारीदेखील आपलाच सरपंच निवडून यावा, याकरिता अहोरात्र परिश्रम घेत आहेत.

नांदगाव खंडेश्वर तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीची सूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानुसार कोदोरी, माऊली चोर, चिखली वैद्य, सावनेर, शेलुगुंड, येवती, लोहगाव या ग्रामपंचायतींमध्ये महिलांसाठी सरपंचपद आरक्षित असल्याने येथे महिलाराज येणार असून तालुक्यात १७ सरपंच तर १३५ ग्रामपंचायत सदस्यासाठी निवडणूक होणार आहे.

तालुक्यातील १७ ग्रामपंचायतींमध्ये थेट सरपंचपदाच्या निवडणुकीसाठी तहसीलदार यांनी नोटीस प्रसिद्ध केली. दरम्यान कोदोरी, चिखली वैद्य, सावनेर, शेलुगंड, येवती, लोहगाव येथे सर्वसाधारण महिला, तर माऊली चोर येथे नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला राखीव आहे. साखरा, पुसनेर, रोहणा, पाळा येथे नागरिकाचा मागास प्रवर्ग, तर खिरसाना, वडाळा, काजना येथे सर्वसाधारण. खेडपिंप्री, पिंपळगाव बैनाई, भगुरा येथे अनुसूचित जाती, असे आरक्षण जाहीर करण्यात आलेले आहे.

या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाली असून, नामनिर्देशनपत्र २८ नोव्हेंबर ते २ डिसेंबर २०२२ या कालावधीत दाखल करण्यात येतील. नामनिर्देशनपत्रांची छाननी पाच डिसेंबर रोजी होईल. नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची अंतिम मुदत सात डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत असून त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप होईल. मतदान १८ डिसेंबर रोजी, तर मतमोजणी दोन दिवसांनी म्हणजेच २० डिसेंबर रोजी होणार आहे.

थंडीत तापणार सरपंचपदाचे राजकारण

ग्रामपंचायतींच्या निवडणुकीकडे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची रंगीत तालीम म्हणून पाहिले जात आहे. त्यामुळे थंडीच्या गारव्यात देखील सरपंचपदाचे राजकारण गावच्या पुढाऱ्यांकडून चांगलेच तापवताना दिसत आहे. या निवडणुकीच्या माध्यमातून तालुक्यातील पुढारीसुद्धा आपली पोळी शेकण्याकरिता मोर्चेबांधणीला लागले आहेत. विविध चर्चांना उधाण येत असून यातून मागील गोष्टींना लक्षात आणून मी कसा चांगला व त्याने काय केले, यावर जोर दिला जात आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway: शक्तिपीठ महामार्ग राज्याची रक्तवाहिनी, शेतकऱ्यांना पाचपटीने मोबदला मिळणार- बावनकुळे

Jowar Pomegranate Rate: ज्वारी, उडदाचे भाव चढ-उतार; डाळिंबाचे दर तेजीत

Sugar Industry: सांगली जिल्ह्यातील साखर उद्योगाला १६८ कोटींचा ‘सॉफ्ट’ आधार

Sunflower Sowing Preparation: खानदेशात सूर्यफूल पेरणीची तयारी

Agrowon Podcast: ज्वारी बाजारात चढ-उतार, उडदाच्या आवकेत बदल, हिरव्या मिरचीच्या दरात स्थिरता, कोथिंबीर दरात चढ-उतार तर डाळींबाचे दर तेजीत

SCROLL FOR NEXT