Electricity
Electricity  Agrowon
ताज्या बातम्या

Agriculture Pump Electricity : ‘महावितरण’ने २८ हजारांवर नादुरुस्त रोहित्रे बदलली

Team Agrowon

Agriculture Electricity Update : मुंबई : उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanavis) यांनी कृषिपंपांचे (Agriculture Pump) नादुरुस्त रोहित्रे (Faulty Transformer) तत्काळ बदलून देण्याचे आदेश दिले आहेत.

या आदेशाची महावितरणने (Mahavitaran) चोख अंमलबजावणी करीत गेल्या सव्वादोन महिन्यांत राज्यभरात तब्बल २८ हजार ४३० नादुरुस्त रोहित्रे बदलण्याची ऐतिहासिक कामगिरी केली आहे. नादुरुस्त रोहित्रे तत्काळ बदलून मिळत असल्याने शेतकऱ्यांना उत्पादनवाढीसाठी बळ मिळाले आहे.

महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी विविध बैठकींद्वारे सर्व क्षेत्रीय कार्यालयांना नादुरुस्त रोहित्रे तत्काळ बदलण्याची सक्त सूचना केली.

दुरुस्तीच्या प्रक्रियेला व ऑइलच्या उपलब्धतेला वेग दिला. यासह महावितरणचे संचालक (संचालन) संजय ताकसांडे यांनी राज्यभर दौरे करून आढावा घेत सर्व परिमंडलामध्ये नादुरुस्त रोहित्रे बदलण्याच्या कार्यवाहीला आणखी वेग दिला.

याची फलनिष्पत्ती म्हणून यंदा महावितरणने आजवरची ऐतिहासिक कामगिरी केली आहे. डिसेंबरमध्ये १७ हजार ७८५, जानेवारीत ८ हजार ४०४ व ८ फेब्रुवारीपर्यंत २ हजार २४१ असे एकूण २८ हजार ४३० नादुरुस्त रोहित्रे बदलली आहेत.

राज्यात कृषिपंपांना वीजपुरवठा करणारे एकूण ७ लाख ५४ हजार रोहित्रे आहेत. गेल्या सव्वादोन महिन्यांमध्ये नादुरुस्त रोहित्रांचे प्रतिदिवस प्रमाण केवळ ३२० ते ३२५ वर आले आहे.

यापूर्वी विविध कारणांमुळे राज्यात दररोज सुमारे ३ हजार ते ३ हजार ५०० रोहित्रे बदलणे शिल्लक राहत असल्याची स्थिती होती. सद्यःस्थितीत महावितरणकडे ऑइलसह सुस्थितीतील ४ हजार ३१२ रोहित्र उपलब्ध आहेत.

तर राज्यात विविध ठिकाणी १९३४ कंत्राटदार एजन्सीकडे आणखी ११ हजार ६५६ रोहित्रांची दुरुस्ती वेगाने सुरू आहे.

परिमंडलनिहाय नादुरुस्त रोहित्रे बदलस्थिती

औरंगाबाद - १८७४

लातूर- ३५४८

नांदेड- २८९३

अकोला- ३४३९

अमरावती- १८७३

नागपूर- २०३

गोंदिया- ६२१

चंद्रपूर- ४६०

बारामती- ४०८६

कोल्हापूर- १४१४

पुणे- ५८६

जळगाव - २४०३

नाशिक - ४७१९

कल्याण - ९८

कोकण - १७५

भांडूप ३८

रोहित्रासाठी शेतकऱ्यांनी खर्च करू नये

शेतकऱ्यांना रोहित्र बदलण्यासाठी कोणत्याही प्रकारचा आर्थिक खर्च करण्याची गरज नाही, असे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

ज्या ठिकाणी कृषिपंपांना वीजपुरवठा करणारे रोहित्र नादुरुस्त झाले असेल, त्यासंबंधीची माहिती शेतकऱ्यांनी महावितरणच्या संबंधित कार्यालयात, अथवा १८००२१२३४३५ किंवा १८००२३३३४३५ या टोल फ्री क्रमांकावर द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Animal Care : वाढत्या उष्णतेचा पशुधनास फटका

Public Well Policy : सार्वजनिक विहिरींच्या पुनरुज्जीवनावर धोरण काय?

Agriculture Irrigation : ‘म्हैसाळ’चे पाणी माडग्याळ शिवारात

Jalgaon Lok Sabha : ...तर जळगावचे चार खासदार पोहोचतील लोकसभेत

Banana Orchard Burn : सातपुड्याच्या पायथ्याशी केळी बागा करपल्या

SCROLL FOR NEXT