Manchar APMC Election Agrowon
ताज्या बातम्या

APMC Election Result : मंचरला १८ पैकी १७ जागा महाविकास आघाडीला

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने तीन जागा बिनविरोध जिंकल्या, तर अन्य १५ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत राज्याचे माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या पॅनेलने १४ जागा जिंकल्या.

Team Agrowon

Manchar APMC Election कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) तीन जागा बिनविरोध जिंकल्या, तर अन्य १५ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत राज्याचे माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या पॅनेलने १४ जागा जिंकल्या.

अशाप्रकारे महाविकास आघाडीने १८ पैकी १७ जागा जिंकून शिवसेना, भाजप, स्वाभिमानी शेतकरी संघटना पॅनेलचे पानिपत केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर नेते देवदत्त निकम हे एकमेव विजयी झाले. पण त्यांच्या पॅनेलमधील सर्व उमेदवारांचा पराभव झाला.

महाविकास आघाडी, शिवसेना, भाजप व स्वाभिमानी शेतकरी संघटना (एकत्र), राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर नेते देवदत्त निकम अशी येथे तिरंगी लढत झाली.

कृषी पतसंस्था व बहुउद्देशीय सहकारी संस्था सर्वसाधारण सात जागांसाठी वीस उमेदवार निवडणूक रिंगणात होते. महाविकास आघाडी विजयी उमेदवारांची नावे : सचिन पानसरे, शिवाजीराव ढोबळे, रामचंद्र गावडे, संदीप थोरात, वसंत भालेराव, गणेश वायाळ व राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर देवदत्त निकम.

सर्व विजेते महाविकास आघाडी : महिला प्रतिनिधी (जागा दोन) रत्ना गाडे, मयूरी भोर, इतर मागास प्रवर्ग (एक जागा) जयसिंग थोरात, अनुसूचित जमाती (एक जागा) सखाराम गभाले, ग्रामपंचायत मतदार संघ (जागा दोन) - नीलेश थोरात, सोमनाथ काळे, अनुसूचित जाती जमाती (जागा एक) संदीप चपटे,

आर्थिकदृष्ट्या दुर्बल (जागा एक) अरुण बांगर, बिनविरोध निवडून आलेली महाविकास आघाडीचे उमेदवार लक्ष्मण बाणखेले, राजेंद्र भंडारी, सुनील खानदेशे. प्रथमच ठाकरे पक्षाला मयूरी भोर यांच्या माध्यमातून बाजार समितीत प्रवेश मिळाला आहे. डिंभे, घोडेगाव, मंचर या तीन मतदान केंद्रांवर देवदत्त निकम हे पिछाडीवर होते. पण निरगुडसर मतदान केंद्रात त्यांनी जोरदार मुसंडी मारून विजयाचा झेंडा फडकविला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Loan Waiver : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे २.९१ लाख कोटींचे कर्ज प्रलंबित; लोकसभेत केंद्र सरकारने दिली आकडेवारी

Fish Farming: क्षारपड जमिनीत मत्स्य संवर्धनाला मोठी संधी 

MGNREGA Scheme: ‘मनरेगा’ ते ‘पूज्य बापू’ प्रवास!

Nagpur Winter Session: बौद्धिक दिवाळखोरी

Sugarcane Cultivation: सिंचनात वाढ अन् ऊस लागवडीला आला भर

SCROLL FOR NEXT