Kisan Rail Agrowon
ताज्या बातम्या

‘Kisan rail: 'किसान रेल्वे`ची महाराष्ट्रात घोडदौड

फळे (Fruits) , भाजीपाला (Vegetables), पोल्ट्री (Poultry), डेअरी (Dairy), मत्स्य उत्पादनांसह शेतीमालाची वाहतुक करण्यासाठी केंद्र सरकारने किसान रेल्वे सुरू केली.

Team Agrowon

किसान रेल्वेच्या (Kisan Rail) माध्यमातून शेतीमालाची वाहतुक करण्यात महाराष्ट्र देशात अव्वल ठरला आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnaw) यांनी नुकतीच संसदेत ही माहिती दिली.

देशात जलद वाहतुकीच्या पुरेशा सुविधा नसल्यामुळे नाशवंत शेतीमाल वाया जाण्याचे प्रमाण मोठे आहे. तसेच देशातील एखाद्या भागात मुबलक उत्पादनामुळे शेतीमालाचे दर पडतात, तर त्याच वेळी देशाच्या दुसऱ्या भागांत त्या शेतीमालाची टंचाई असल्यामुळे ग्राहकांची परवड होते. त्यामुळे फळे (Fruits) , भाजीपाला (Vegetables), पोल्ट्री (Poultry), डेअरी (Dairy), मत्स्य उत्पादनांसह शेतीमालाची वाहतुक करण्यासाठी केंद्र सरकारने किसान रेल्वे सुरू केली.

देशात ७ ऑगस्ट २०२० रोजी किसान रेल्वे धावायला सुरुवात झाली. विशेष म्हणजे महाराष्ट्रातूनच पहिल्या किसान रेल्वेला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. महाराष्ट्रातील देवळाली ते बिहारच्या धनपूर दरम्यान देशातील पहिली किसान रेल्वे (Kisan Rail) धावली.

शेतीमालाची जलद, सुरक्षित वाहतुक करण्यासाठीचा विश्वासार्ह पर्याय म्हणून हा उपक्रम सुरू करण्यात आल्याचा केंद्र सरकारचा दावा आहे. वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, आजवर किसान रेल्वेच्या २३०० हून अधिक खेपा झालेल्या आहेत. किसान रेल्वेमुळे (Kisan Rail) देशातील विविध बाजारांमध्ये शेतीमाल किमान वेळेत पाठवण्याची सोय शेतकऱ्यांना उपलब्ध झाली आहे.

रेल्वेमंत्री वैष्णव यांनी संसदेत दिलेल्या लेखी उत्तरानुसार, ७ ऑगस्ट २०२० ते ३० जून २०२२ अखेरपर्यंत आसाम, आंध्र प्रदेश, गुजरात, कर्नाटक, महाराष्ट्र , मध्य प्रदेश, पंजाब, राजस्थान, तेलंगणा, त्रिपुरा, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल या राज्यांतून किसान रेल्वेच्या २३५९ खेपा झाल्या आहेत. किसान रेल्वेचा (Kisan Rail) वापर करण्यात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे.

किसान रेल्वेच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी ७.९ दशलक्ष टन धान्य, दुग्धोत्पादने, फळे, भाजीपाला आदी नाशवंत मालाची वाहतूक केली आहे. यात केळी, कांदे, बटाटे, आले, लसूण, द्राक्ष, डाळिंब, मोसंबी यांचे प्रमाण अधिक आहे, असे वैष्णव यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Drought: दुष्काळ जाहीर होणार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

Indian Oil Trade: कच्च्या तेलाची आयात; पॅकबंद तेलाची निर्यात

India US Trade: अमेरिकेपुढे झुकण्याची घोडचूक नको

EL Nino 2026 : तेलंगणामध्ये पावसाची तूट; केंद्र सरकारकडे २० हजार कोटींच्या मदत पॅकेजची मागणी

Weekly Weather: उघडिपीसह अल्प पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT