ताज्या बातम्या

Banana Market : शालेय पोषण आहारात केळीचा समावेश करावा ; केळी उत्पादक संघाची मागणी

Agriculture News : शालेय पोषण आहारामध्ये केळीचा समावेश करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य केळी उत्पादक संघाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

Team Agrowon

Banana MSP : शालेय पोषण आहारामध्ये केळीचा समावेश करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य केळी उत्पादक संघाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. केळीला १८.९० रुपयांचा हमीभाव आणि इतर मागण्यांसाठी संघाच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली.

केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध समस्या आणि मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य केळी उत्पादक संघाच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी केळीचा शालेय पोषण आहारात समावेश करण्याच्या मागण्यांसह केळीला हमीभाव मिळावा, प्रतिबंधित असणारी औषधे कृषी सेवा केंद्रावर सापडल्यास संबंधित कृषी अधिकाऱ्यांना जबाबदार धरावे, अशी मागणी शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांकडे केल्या.

शालेय पोषण आहारात होणार केळीचा समावेश

केळी उत्पादकांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत मुख्यमंत्री शिंदे येत्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये शालेय पोषण आहारामध्ये केळीचा समावेश करण्याबाबतचा विषय घेण्याच्या सूचना मुख्य सचिवांना केल्या आहेत. त्यामुळे येणाऱ्या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांच्या शालेय पोषण आहारात केळीचा समावेश केला जाण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात केळीचे उत्पादन घेतले जाते. मात्र, केळी पिकाला कोणत्याही प्रकारचा हमीभाव मिळत नाही. शेतकऱ्यांकडून वारंवार केळीला हमीभाव देण्याची मागणी केली जात आहे. एप्रिलमध्ये सावदा येथे राज्यस्तरीय केळी परिषद पार पडली होती. या परिषदेत केळी उत्पादकांच्या समस्या आणि मागण्यांवर चर्चा करण्यात आली होती. यावेळी या परिषदेत काही ठरावही करण्यात आले होते.

केळी परिषदेतील ठराव

  • केळीचा शालेय पोषणात समावेश करणे,

  • केळीला. १८.९० रुपये हमीभाव द्यावा.

  • विमा कंपन्यांच्या मनमानी थांबवून शेतकऱ्यांना योग्य मोबदला द्यावा.

  • तसेच प्रतिबंधित असणारी औषधे, खते कृषी केंद्रावर विक्री केल्यास संबंधित कृषी अधिकाऱ्यांना जबाबदर धरावे.

दरम्यान, गेल्या काही वर्षात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे केळी पिकाला मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. त्यामुळे केळी उत्पादकांना मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. केळीला मिळणाऱ्या दरातून उत्पादन खर्चही निघत नसल्याने केळी उत्पादक अडचणीत सापडला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Relief: नाशिकसह तीन जिल्ह्यांतील १ लाख ४५ हजार शेतकऱ्यांना दिलासा, ८६ कोटी ६५ लाख मदत मंजूर

Agri University Research : कृषी विद्यापीठाची संशोधनात ओळख अधिक बळकट होईल

Ring Road Project : रिंग रोड बाधितांचा शासनाविरोधात एल्गार

Murrah Buffalo Subsidy: मुऱ्हा म्हैस खरेदीसाठी ‘चितळे’ देणार अनुदान

Kisan Credit Card : किसान क्रेडिट कार्ड, पशू किसान क्रेडिट कार्डातील अडचणी सोडवा

SCROLL FOR NEXT