Maharashtra SSC Result Live  Agrowon
ताज्या बातम्या

Maharashtra SSC Result 2023 : दहावीचा निकाल जाहीर, निकालात यंदाही मुलीच वरचढ ; राज्याचा एकूण निकाल ९३.८३ टक्के

Maharashtra SSC Result Live Update : यावर्षी ९८.११ टक्क्यांसह कोकण विभाग निकालात अव्वल राहिला आहे. तर नागपूर विभागाचा निकाल सर्वात कमी ९२.०५ टक्के लागला आहे.

Team Agrowon

Latest Update Maharashtra SSC Result 2023 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या दहावीच्या परिक्षांचा निकाल जाहीर झाला आहे. मार्च २०२३ मध्ये घेतलेल्या दहावीच्या परिक्षेचा निकाल महाराष्ट्र शिक्षण मंडळाने जाहीर केला आहे. यंदा राज्याचा एकूण निकाल ९३.८३ टक्के लागला असून यावर्षीही निकालात मुलींच वरचढ राहिल्या आहेत.

यावर्षी ९८.११ टक्क्यांसह कोकण विभाग निकालात अव्वल राहिला आहे. तर नागपूर विभागाचा निकाल सर्वात कमी ९२.०५ टक्के लागला आहे. शिक्षण मंडळाने याबाबतची माहिती पत्रकार परिषद घेवून दिली आहे.

यावर्षी महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून २ मार्च ते २५ मार्च या कालावधिमध्ये दहावीची परिक्षा घेण्यात आली होती.

राज्यातील २३ हजार १० शाळांमधील १५ लाख ७९ हजार ३७४ विद्यार्थ्यांनी परिक्षा दिली होती. यावर्षीही निकालात मुलींनी बाजी मारली असून ९५.८७ टक्के मुली दहावीत उत्तीर्ण झाल्या आहेत. तर ९२.०५ टक्के मुले उत्तीर्ण झाले आहेत.

कोकण विभाग अव्वल

यंदाच्या दहावीच्या निकालात कोकण विभागाने अव्वल क्रमांक पटकावला आहे. कोकण विभागापाठोपाठ पुणे, मुंबई, छ. संभाजीनगर, अमरावती, लातूर, नाशिक आणि नागपूर विभागाची कामगिरीही चांगली राहिली आहे. यावर्षी कोकण विभागाचा सर्वाधिक ९८.११ टक्के निकाल लागला आहे. तर नागपूर विभादाचा सर्वात कमी ९२.०५ टक्के निकाल लागला आहे.

निकालात मुलीच नंबर वन

बोर्डाच्या बारावीच्या निकालापाठोपाठ दहावीच्या निकालातही मुलींनी बाजी मारली आहे. यंदा दहावीच्या निकालात ९५.८७ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या असून मुलांचं उत्तीर्ण होण्याचं प्रमाण ९२.०५ टक्के इतके आहे.

विभागनिहाय निकालाची टक्केवारी

  • कोकण - ९८.११ %

  • कोल्हापूर - ९६.७३ %

  • पुणे - ९५.६४ %

  • मुंबई - ९३.६६ %

  • औरंगाबाद - ९३.२३ %

  • अमरावती - ९३.२२ %

  • लातूर - ९२.६७ %

  • नाशिक - ९२.२२ %

  • नागपूर - ९२.०५ %

या संकेतस्थळावर पाहता येणार निकाल

शुक्रवारी २ जून रोजी दुपारी १ वाजता दहावीचा निकाल जाहीर होणार आहे. विद्यार्थ्यांना बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावर आपला निकाल पाहता येणार आहे. विद्यार्थ्यांना पुढील संकेतस्थळांवर निकाल पाहता येणार आहे.

  • mahahsscboard.in

  • mahresult.nic.in

  • www.mahresult.nic.in

  • http://sscresult.mkcl.org

  • https://ssc.mahresults.org.in

असा पाहा निकाल

  • सर्वात आधी mahresult.nic.in या अधिकृत संकेतस्थळावर जा.

  • येथे दहावीच्या निकालाच्या लिंकवर क्लिक करा.

  • त्यानंतर विद्यार्थ्याचा परिक्षा क्रमांक, जन्मतारीख, आईचे नाव अशी आवश्यक माहिती भरा.

  • त्यानंतर दहावीचा निकाल तुमच्या स्क्रीनवर दिसेल.

  • येथून तुम्ही निकालाची प्रिंट काढू शकता किंवा मोबाईलमध्ये सेव्ह करू शकता.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Lalya: कपाशीवर लाल्याचा प्रादुर्भाव? योग्य कारण ओळखूनच करा उपाय

Water Storage Crisis: सांगली जिल्ह्याच्या जलसाठ्यावर संकटाचे ढग

Indian Railways : अहिल्यानगर-बीड रेल्वे प्रवास होणार सुपरफास्ट

Toll Waiver: गणेशभक्तांसाठी आनंदाची बातमी, यंदाही टोलमाफी, पास उपलब्ध

Devlali Danapur Express : देवळाली-दानापूर शेतकरी समृद्धी रेल्वेची १०० वी फेरी पूर्ण

SCROLL FOR NEXT