Maharashtra SSC Result 2023 : तारीख ठरली ; उद्याच लागणार दहावीचा निकाल

Maharashtra SSC Board Exam Result : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मार्च २०२३ मध्ये घेतलेल्या दहावीच्या परिक्षेच्या निकालाची तारीख जाहीर झाली आहे.
Maharashtra SSC Result 2023
Maharashtra SSC Result 2023agrowon
Published on
Updated on

Maharashtra SSc Result 2023 Update : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मार्च २०२३ मध्ये घेतलेल्या दहावीच्या परिक्षेच्या निकालाची तारीख जाहीर झाली आहे. दहावीच्या निकालासंदर्भात बोर्डाने महत्त्वाची अपडेट दिली आहे.

बोर्डाच्या माहितीनुसार शुक्रवारी २ जून रोजी दहावीचा निकाल जाहीर होणार आहे. विद्यार्थ्यांना दुपारी १ वाजता बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने हा निकाल पाहता येणार आहे.

गेल्या आठवड्यात बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर दहावीचा निकालाची उत्सुकता लागून राहिली होती. अखेर उद्या दुपारी १ वाजता दहावीचा निकाल जाहीर होणार असून दहावीची परिक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसोबतच पालकांचीही धाकधूक वाढली आहे. त्यामुळे उद्याचा दिवस विद्यार्थी आणि पालकांसाठी महत्त्वाचा असणार आहे.

Maharashtra SSC Result 2023
Agriculture Science Center : पर्यावरणपुरक जीवन पद्धतीबाबत कृषी विज्ञान केंद्राद्वारे जनजागृती

या संकेतस्थळावर पाहता येणार निकाल

शुक्रवारी २ जून रोजी दुपारी १ वाजता दहावीचा निकाल जाहीर होणार आहे. विद्यार्थ्यांना बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावर आपला निकाल पाहता येणार आहे. विद्यार्थ्यांना पुढील संकेतस्थळांवर निकाल पाहता येणार आहे.

  • mahahsscboard.in

  • mahresult.nic.in

  • www.mahresult.nic.in

  • http://sscresult.mkcl.org

  • https://ssc.mahresults.org.in

Maharashtra SSC Result 2023
Agriculture Research : शेतकरी केंद्रीत हवे संशोधन

असा पाहा निकाल

  • सर्वात आधी mahresult.nic.in या अधिकृत संकेतस्थळावर जा.

  • येथे दहावीच्या निकालाच्या लिंकवर क्लिक करा.

  • त्यानंतर विद्यार्थ्याचा परिक्षा क्रमांक, जन्मतारीख, आईचे नाव अशी आवश्यक माहिती भरा.

  • त्यानंतर दहावीचा निकाल तुमच्या स्क्रीनवर दिसेल.

  • येथून तुम्ही निकालाची प्रिंट काढू शकता किंवा मोबाईलमध्ये सेव्ह करू शकता.

दरम्यान, राज्य शिक्षण मंडळाची यंदाची दहावीची परीक्षा २ मार्च २०२३ ते २५ मार्च २०२३ या कालावधीत पार पडली. यावर्षी राज्यातील १५ लाख ७७ हजार २५६ विद्यार्थ्यांनी दहावीची परिक्षा दिली होती. यामध्ये ८ लाख ४४ हजार ११६ मुले आणि ७ हजार ३३ हजार ०६७ मुलींचा समावेश होता.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com