Strawberries Agrowon
ताज्या बातम्या

Strawberry Market : महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी पेणमध्ये दाखल

सध्या महाबळेश्वर, पाचगणी आणि नाशिक येथील स्ट्रॉबेरी बाजारपेठेत दाखल झाली आहे. पेणच्या हमरस्त्यावर महाबळेश्वर येथून दररोज अनेक विक्रेते स्‍ट्रॉबेरी घेऊन येतात.

Team Agrowon

पेण, जि. रायगड : काही दिवसांपासून थंडीचे प्रमाण वाढले आहे. त्‍यामुळे महाबळेश्‍वरची लाला-गुलाबी स्‍ट्रॉबेरी (Strawberries In Pen Market) पेणच्या बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात दाखल झाली आहे. अवकाळी पावसामुळे स्ट्रॉबेरीच्या उत्पादनावर (Strawberry Production) काहीसा परिणाम झाला असला तरी ग्राहकांकडून मोठी मागणी आहे.

मुंबईतील वाशी, पुणे या मुख्य फळ बाजारपेठेत स्ट्रॉबेरीची आवक वाढल्‍याने सध्या बाजारात ५० हजारांच्या वर स्‍ट्रॉबेरीचा एक क्रेट मिळतो आहे.

साधारण २५० ते २७० रुपये किलो असा दर आकारला जातो. ग्राहकांकडून स्‍ट्रॉबेरीला मागणी असल्‍याने चांगला भाव मिळत असल्‍याचे विक्रेते सांगतात.

महाबळेश्वर, पाचगणी येथे स्ट्रॉबेरीचे मोठमोठे मळे असून हिवाळ्यात उत्‍पादन येते. साधारण डिसेंबर, जानेवारीमध्ये बाजारात स्‍ट्रॉबेरीची आवक वाढते. काही विक्रेते महामार्गालगत स्‍ट्रॉबेरीचे पाव, अर्धा किलोचे पॅकेट विक्रीसाठी बसलेले दिसतात.

मध्यंतरी हवामान बदलामुळे स्ट्रॉबेरीचा हंगाम लांबणीवर गेला होता, त्‍यामुळे उत्‍पादन बाजारात येण्यास काहीसा विलंब झाला. मात्र सध्या बाजारात स्‍ट्रॉबेरीची आवक वाढली आहे.

शिवाय ग्राहकांकडूनही पसंती मिळत असल्‍याने फळबाजार, महामार्ग, मुख्य रस्‍त्‍यावर स्‍ट्रॉबेरी विक्रेते दिसून येत आहेत.

महाबळेश्वर, पाचगणी येथून दररोज ५० ते ६० किलो स्ट्रॉबेरी पेणच्या बाजारपेठेत विक्रीसाठी आणली जाते. स्ट्रॉबेरीचा हंगाम पुढे गेल्‍याने सध्या दर वाढले आहेत. मात्र उत्‍पादन मोठ्या प्रमाणात झाल्‍याने लवकरच दर स्‍थिर होतील.
इम्तियाज बागवान, स्ट्रॉबेरी विक्रेता
यंदा स्ट्रॉबेरी बाजारात येण्यास उशीर झाला, मात्र मागणीबरोबरच उत्‍पादनही वाढले आहे.
अशोक पाटील, ग्राहक

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT