lumpy skin Agrowon
ताज्या बातम्या

Lumpy Skin : लम्पी स्कीन’ प्रादूर्भावाचा मंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला आढावा

लम्पी चर्म रोगाचा प्रादुर्भाव कराड, फलटण, सातारा व खटाव तालुक्यातील काही पशुधनाला झाला आहे.

Team Agrowon

लम्पी चर्म (Lumpy skin) रोगाचा प्रादुर्भाव कराड, फलटण, सातारा व खटाव तालुक्यातील काही पशुधनाला (livestock) झाला आहे. हा प्रादूर्भाव वाढू नये यासाठी जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन ( Animal husbandry) व जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालयाने प्रतिबंधात्मक उपाय योजना कराव्यात, असे निर्देश राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी दिले. सातारा जिल्ह्यात उद्भवलेल्या लम्पी चर्म रोग प्रादुर्भावाची सद्यःस्थितीचा आढावा श्री. देसाई यांनी मंत्रालय, मुंबई येथून दूरदृश्यप्रणालीद्वारे घेतला. या आढावा बैठकीला जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी (दूरदृश्यप्रणाली द्वारे), सातारा जिल्हा परिषदेमधून मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) अर्चना वाघमळे, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. अंकुश परिहार आदी उपस्थित होते.

श्री. देसाई म्हणाले, ‘‘ज्या गावांमधील पशुधनास लम्पी त्वचा आजारची लागण झाल्याचे समजतात तत्काळ भेट देऊन पशुधनास उपचार करावे. यासाठी पशुसंवर्धन विभागाने सज्ज राहावे. लम्पी आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाकडूनही मदत केली जाईल. जिल्ह्यातील पशुपालकांनी पशुधनास लम्पी आजाराचे लक्षणे आढळल्यास घाबरून न जाता पशुसंवर्धन विभागाशी संपर्क साधून औषधोपचार करावेत,’’ असेही आवाहन मंत्री श्री. देसाई यांनी केले.जिल्हाधिकारी श्री. जयवंशी यांनी जिल्ह्यात लम्पी चर्म रोगाबाबत करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.

जिल्ह्यात ४६ हजार ९०० एवढ्या लसमात्रा उपलब्ध असून त्यापैकी १७ हजार २४१ लसमात्रांचा वापर करून पशुधनास लसीकरण करण्यात आले. २६ हजार ६५९ लसमात्रा शिल्लक असून त्याद्वारे लसीकरणाची कार्यवाही सुरू आहे. तसेच पशुसंवर्धन आयुक्त कार्यालयाकडे २ लाख लसमात्रांची मागणी करण्यात आल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गौडा यांनी यावेळी बैठकीत सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT