Lumpy Skin
Lumpy Skin Agrowon
ताज्या बातम्या

Lumpy : ‘लम्पी स्कीन’ची पशुधनाला लागण

टीम ॲग्रोवन

पुणे ः पुणे आणि नगर जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या कोपरे मांडवे (ता. जुन्नर) येथील ८ गायी आणि बैलांना लम्पी स्कीन रोगाची लागण (lumpy Skin Disease Infection To Livestock) झाली आहे. यामुळे जिल्हा पशुसंवर्धन विभाग (Department Of Animal Husbandry) सतर्क झाला असून, लगतच्या असलेल्या अकोले (जि. नगर) येथे देखील बाधित पशुधन (Livestock) होते. यामुळे आता पशुधनाची देखील तपासणी आणि तातडीचे उपचार सुरू करण्यात आले आहे.

या बाबतची माहिती जिल्हा परिषदेचे पशुसंवर्धन अधिकारी शिवाजी विधाटे यांनी दिली. ते म्हणाले, ‘‘नगर जिल्हा सीमेजवळील जुन्नर तालुक्यातील मांडवे गावात लम्पी त्वचा रोग आढळला. नगरमधील अकोले तालुका यापूर्वी बाधित होता. या तालुक्यातून प्रादुर्भाव झाला असल्याचा प्राथमिक अंदाज असून, कोपरे मांडवे (ता. जुन्नर) येथील ८ जनावरे बाधित झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

या आजाराचा फैलाव वाढू नये यासाठी पशुधनाचा बाजार बंद करणे, वाहतूक रोखणे आणि लसीकरण यासारखे खबरदारीच्या उपाययोजनांचे टप्पे सुरू केले आहेत. या प्रादुर्भावामुळे पशुसंवर्धन विभागाचे अतिरिक्त आयुक्त डॉ. धनंजय परकाळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद बाधित गावांचा दौरा करणार आहेत.

आजाराचा फैलाव वाढू नये यासाठी परिसरातील एक किलोमीटरच्या परिघातील सर्व पशुधनांचे लसीकरण सुरू करण्यात आले आहे. तर परिसरातील जनावरांचे बाजार बंद करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Export Ban : केंद्र सरकारच्या चलाखीमुळे कांदा निर्यातीवरील लगाम कायम

Kolhapur Water Shortage : गावांना टँकरद्वारे पाण्याची गरज, लोकप्रतिनिधी, प्रशासन निवडणुक कामात व्यस्थ

Agriculture Industry : उद्योगाच्या घरी रिद्धी-सिद्धी...

Success Story : अल्पभूधारकांच्या शेतात फुलली हिरवाई

Onion Export : कांदा निर्यातबंदी उठवली, मात्र निर्यात वाढणार नाही याचीही सोय केली

SCROLL FOR NEXT