Ajit Pawar News Agrowon
ताज्या बातम्या

Ajit Pawar : दहा लाख हेक्टरचे नुकसान; तरीही भरपाई नाही

विदर्भ- मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे १० लाख हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे.

टीम ॲग्रोवन

मुंबई : विदर्भ- मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे (Heavy Rain) १० लाख हेक्टर क्षेत्राचे नुकसान (Crop Damage) झाले आहे. मनुष्य आणि पशुहानी (Animal Death) झाली आहे. नुकसान होऊनही शेतकऱ्यांना अद्याप भरपाई (Compensation) मिळालेली नाही, त्यामुळे तातडीने भरपाई मिळावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी पत्रकार परिषदेत केली.

तसेच मुख्यमंत्री गावोगावी सत्कार स्वीकारण्यात मश्गूल असल्याने फायलींचा गराडा आहे. त्यामुळे राज्याचा गाडा रुतला आहे, अशी टीकाही त्यांनी केली. पवार यांनी अतिवृष्टीच्या पार्श्‍वभूमीवर विदर्भ आणि मराठवाड्याचा दौरा केला. या दौऱ्यादरम्यान त्यांनी शेतीच्या नुकसानीची पाहणी करून विदर्भात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी केली होती. या दौऱ्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीच्या मुख्यालयात पत्रकार परिषद घेत राज्य सरकारवर टीका केली.

पवार म्हणाले, ‘‘विदर्भ, मराठवाड्यात सोयाबीनवर गोगलगायीच्या आक्रमणामुळे काही हजार हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. या भागाचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दौरा केला परंतु त्यांनी केंद्र सरकारला अद्याप कळविलेले नाही. त्यामुळे केंद्राचे पथक पाहणीसाठी आलेले नाही. विदर्भ, मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे दहा लाख हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. त्यामुळे कृषी विभागाने आणि सरकारने यामध्ये हस्तक्षेप करायला हवा. अतिवृष्टी भागातील काही ठिकाणचे पंचनामेच केलेले नाही. या शेतकऱ्यांना तातडीची आर्थिक मदत मिळायला हवी तिथे ती मिळालेली नाही. मनुष्यहानी झालेल्याना चार लाखांची मिळालेली मदत तुटपुंजी आहे. पशुधनाची भरपाई मिळालेली नाही.

मंत्रिमंडळ नसल्याने फायली थांबल्या

एक महिना उलटला तरी राज्यात मंत्रिमंडळ विस्तार नाही. त्यांना दिल्लीतून सिग्नल मिळत नाही की एकनाथ शिंदे यांनी आमदारांना शब्द दिल्याने अपेक्षा वाढल्या आहेत, हे अद्याप कळायला मार्ग नाही, असा टोला पवार यांनी लगावला. मुख्यमंत्र्यांकडे सर्व खात्याचे अधिकार आहेत. उपमुख्यमंत्री यांना खातेच दिलेले नाही. त्यामुळे प्रत्येक फाइल मुख्यमंत्री यांच्याकडे जात आहेत. मात्र सहीअभावी फायली थांबल्या आहेत. सह्या करायला मुख्यमंत्र्यांना वेळच नाही. उपमुख्यमंत्र्यांना अधिकारच दिलेला नाही. राज्य सरकारचे काम गतीने व्हायला हवे व जनतेची कामे झाली पाहिजेत, मात्र तसेच होत नाही.

शेतकऱ्यांकडे पाहा

राज्यात अतिवृष्टीमुळे शेतजमिनीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. मात्र मुख्यमंत्री इतर व्यापात आहेत. मार्गदर्शन आणि दर्शन घेत आहेत. मात्र त्याआधी १३ कोटी जनतेचे तुम्ही प्रतिनिधित्व करता अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत त्याकडे लक्ष द्या, असा सल्लाही त्यांनी दिला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Farmer Challenges: पांढऱ्या सोन्याची शोकांतिका

Indian Farmer Challenges: आठ हात लाकूड, नऊ हात धिपली

Pune Water Circulation: नऊ धरणांतून उन्हाळी आवर्तन

Job Recruitment Policy: नोकरी देताना भरती नियमांचे पालन आवश्‍यक

Ready Reckoner Rates: रेडीरेकनर दर वाढ स्थगित

SCROLL FOR NEXT