नगर ः जिल्ह्यातील बहुतांश भागात अजूनही जोरदार पाऊस (Heavy Rain) नाही. मात्र अकोले तालुक्यात तसेच जिल्ह्यातील काही भागांत मागील महिन्यात सातत्याने झालेल्या पावसाने (Continues Rain) एकशे वीस गावांत तीन हजार ४० हेक्टरवरील पिकांना सततच्या पावसाचा, अतिवृष्टीचा फटका (Crop Damage Due To Heavy Rain) बसला आहे. या महिन्यात जास्त फटका बसला असल्याचे दिसत आहे.
नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्याच्या आदिवासी भागात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे. त्याचा भात शेतीला मोठा फटका बसला आहे. याशिवाय या महिन्यात तसेच मागील काही दिवसांत जिल्ह्यातील काही भागांत संततधार पाऊस, अतिवृष्टी, नदीकाठच्या शेतीला पुराचा फटका यामुळेही शेतपिकांचे नुकसान झाले आहे.
प्रशासनाने पंचनामे केले आहेत. त्यानुसार जून महिन्यात श्रीगोंद्यातील नऊ, जामखेड, शेवगावमधील दोन, संगमनेरमधील चार, अकोल्यातील एक अशा १८ गावांतील ४४४ शेतकऱ्यांचे २०० हेक्टरवर नुकसान झाले आहे. जुलै महिन्यात अकोले तालुक्यातील १९ हजार शेतकऱ्यांचे ४३२ हेक्टरवर नुकसान झाले आहे. या (ऑगस्ट) महिन्याची संपूर्ण नुकसानीची स्थिती स्पष्ट झाली नसली तरी प्राथमिक माहिती समोर आली आहे.
कृषी विभागाने दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार २ हजार ४८१ हेक्टरवर ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे. त्यात मका, कापूस, मूग, सोयाबीन, भाजीपाला, चारा पिकांना जास्तीच्या पावसाचा फटका बसला आहे. या महिन्यात नगर तालुक्यातील पाच गावांत, राहुरीमधील पाच गावांत, कोपरगावांतील ९ गावांत, व राहत्यातील पाच गावांत नुकसान झाले असल्याचा अहवाल आहे असे सांगण्यात आले.
३३ टक्क्यांपेक्षा कमी नुकसानीचे प्रमाण अधिक
पाऊस, गारपीट, वादळ, सततचा पाऊस, अतिवृष्टी यामुळे झालेल्या शेतपीकांच्या नुकसानीपोटी मदत देण्यासाठी शासनाने ३३ टक्क्यांची अट घातली आहे. नगर जिल्ह्यातील अनेक भागांत, विशेषतः दक्षिण जिल्ह्यातील अनेक गावांत अजून पुरेसा पाऊस नाही. मात्र मागील पंधरा दिवसांत, तसेच मागील महिन्यातही संततधार पाऊस झाला. काही अपवादात्मक भागात अतिवृष्टी झाली. त्यात शेतपीकांचे नुकसान झाले. शासनाने केलेल्या पंचनाम्यानुसार सुमारे साडेचार हजारांपेक्षा अधिक क्षेत्रावर ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले. मात्र ३३ टक्क्यांपेक्षा कमी नुकसान निकषात बसत नसल्याने त्यांना मदत मिळणार नाही. ३३ टक्क्यांपेक्षा कमी नुकसानीचे प्रमाण नेहमीच अधिक राहिलेले आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.