Zilla Bank Agrowon
ताज्या बातम्या

Zilla Bank : जिल्हा बँकेकडून आजपासून कर्ज वसुली मोहिमेस प्रारंभ

परतफेड न करणारे १०० बडे थकबाकीदार रडारवर

Team Agrowon

नाशिक : जिल्हा बँकेचे मोठे व प्रभावशाली असलेले तसेच हेतुपुरस्सर कर्ज परतफेड न करणाऱ्या थकबाकीदारांकडून वसुली होण्यासाठी जिल्हा बँकेतर्फे मंगळवार (ता. १) वसुली मोहिमेस होत आहे. जास्तीत जास्त थकबाकीदारांनी कर्ज फेडत कारवाई टाळावी, असे आवाहन बँक प्रशासक, मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केले आहे.


२०२२ -२०२३ या आर्थिक वर्षातील कर्जवसुली हंगाम एक नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. सद्यःस्थितीत बँकेची आर्थिक स्थिती अतिशय खराब असल्याने बँकेची आर्थिक पत वाढविण्यासाठी प्रशासकाकडून प्रयत्न केले जात आहे. बँकेची एकूण २,१५६ कोटींची रक्कम वसुलीस पात्र असून, त्यापैकी रक्कम १,४५२ कोटीची जुनी थकबाकी आहे.

वसुली हंगामात जास्तीत जास्त वसुली करण्याच्या उद्देशाने जिल्ह्यातील मोठे व प्रभावशाली असलेले तसेच हेतुपुरस्सर कर्ज परतफेड न करणारे थकबाकीदार सभासदांवर सर्व कायदेशीर बाबीची पूर्तता करून थकबाकी कर्ज वसुलीसाठी कार्यवाही सुरू करण्यास आदेशही प्रशासक यांच्याकडून सर्व शाखांच्या अधिकारी यांना देण्यात आले आहे. या आदेशानुसार मोहीम सुरू झाली आहे. प्रत्येक तालुक्यात पालक अधिकारी नेमण्यात आले आहे


 जिह्यातील सर्व थकबाकीदार सभासदांनी कारवाई टाळून थकबाकीचा भरणा करून बँकेच्या सामोपचार योजनेमध्ये थकबाकीदारांसाठी भरघोस व्याज सवलत देऊ केलेली असल्याने थकबाकीदारांनी या योजनेचा लाभ घेऊन थकबाकीचा भरणा करून बँकेस सहकार्य करण्याचे आवाहन प्रशासक अरुण कदम व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. शैलेश पिंगळे यांनी बँकेच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.

१२ बड्या थकबाकीदारांकडून वसुली...


जिल्ह्यातील बडे थकबाकीदार यांच्याकडून वेळेत वसुली न झाल्याने बँकेने सर्वाधिक थकबाकीदार असलेल्या १०० जणांनी यादीच प्रसिद्ध केली होती. ही यादी प्रसिद्ध झाल्यानंतर १२ बडे थकबाकीदार यांच्याकडून वसुली अद्यापपर्यंत झाली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

livestock Vaccination: पशुवैद्यक महाविद्यालयातर्फे इटलापूर येथे पशुधनाचे लसीकरण

Mahareshim Abhiyan: हिंगोलीत महारेशीम अभियानात १२० शेतकऱ्यांची नोंदणी

Watermelon Disease Control: अवकाळीनंतर कलिंगडावर रोगांचा धोका! कसे करावे नियंत्रण?

Sugarcane Production Drops: ऊस पिकाच्या उत्पादनात मोठी घट

Krushi Kumbh Exhibition: ‘कृषी कुंभ’ प्रदर्शनाचे आयोजन नेटके,मात्र शासकीय यंत्रणांची उदासीनता

SCROLL FOR NEXT