Livestock market Agrowon
ताज्या बातम्या

Lumpy Skin : पशुधन बाजार, शर्यत, जत्रेवर बंदी

जिल्ह्यात या रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जनावरांचा बाजार भरविणे, शर्यती लावणे, जत्रा भरविणे व प्राण्यांचे प्रदर्शन आयोजित करण्यावर बंदी घालण्यात आली आहे.

टीम ॲग्रोवन

राज्यात काही जिल्ह्यांत जनावरांमध्ये लम्पी चर्मरोगाचा (Lumpy Skin Disease) प्रादुर्भाव आढळून आला आहे. जिल्ह्यात या रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जनावरांचा बाजार भरविणे, (Livestock Market Closed) शर्यती (Bullock Cart Race) लावणे, जत्रा भरविणे व प्राण्यांचे प्रदर्शन आयोजित करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले (Rahul Kardile) यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत.राज्यात जळगाव, अहमदनगर, अकोला, पुणे व धुळे या जिल्ह्यांत लम्पीचा प्रादुर्भाव (Lumpy Skin Outbreak) आढळला आहे.

जिल्ह्यात तूर्तास या रोगाचा शिरकाव झालेला नाही. परंतु अहमदनगर, पुणे, अकोला, अमरावती या जिल्ह्यांतून वर्धा जिल्ह्यात जनावरांची खरेदी-विक्री होत असल्याने आजारी जनावरांसोबत संपर्क होण्याची शक्यता आहे. या माध्यमातून लम्पीचा जिल्ह्यात प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी सदर उपाययोजना करण्यात आल्या आहे.जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिलेल्या आदेशाप्रमाणे गोजातीय प्रजातीची सर्व गुरे व म्हशी यांची ज्या ठिकाणी ते पाळले जातात किंवा ठेवण्यात आले आहेत, त्या ठिकाणापासून अन्य कोणत्याही ठिकाणी ने-आण करण्यास बंदी राहील.

या प्रजातीची बाधित असलेली जिवंत किंवा मृत गुरे व म्हशी तसेच बाधित प्राण्यांच्या संपर्कात आलेली वैरण, गवत व अन्य साहित्य, बाधित प्राण्यांचे शव, कातडी किंवा अन्य कोणताही भाग किंवा यापासून बनविलेले उत्पादने यावर जिल्ह्यात प्रवेश आणि वाहतुकीस बंदी राहणार आहे.गुरे व म्हैसवर्गीय प्राण्यांचा बाजार भरविणे, शर्यती लावणे, जत्रा भरविणे, प्रदर्शन आयोजित करणे आणि प्राण्यांचे गट करून किंवा त्यांना एकत्रित करून कोणताही कार्यक्रम आयोजित करता येणार नाही.

आठवड्यांतून एकदा फवारणी करावी लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामपंचायती, नगर परिषद व नगर पंचायतींनी गोचिड, गोमाशा निर्मूलनाकरिता आपापल्या क्षेत्रातील जनावरांच्या गोठ्यामध्ये आणि जनावरांवर दर आठवड्यातून एकदा आळीपाळीने फवारणी करावी. नागरिक आणि शेतकरी व पशुपालकांमध्ये या रोगाबाबत जनजागृती करावी. आपल्या क्षेत्रात आठवड्यातून किमान दोन वेळा व्यापक दवंडी देण्यात यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी सर्व संबंधितांना दिले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Relief: शेतकऱ्यांना वीजबिल मुक्तीची पत्रे पाठविणार; मुख्यमंत्री फडणवीस

Kalyan-Latur Highway Oppose: लातूर महामार्गाला जुन्नरमध्ये तीव्र विरोध

Forest Rights Farmers Issue: वनहक्क पट्टेधारक शेतकरी ‘ॲग्रीस्टॅक’वरून ‘गायब’

Agriculture Inspection: पीक पाहणीचा पाठपुरावा करावा; ‘महसूल’च्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

Tobacco Streak Virus: कापसावर तंबाखू स्ट्रिक विषाणू ओळखा! नियंत्रणाचे उपाय काय?

SCROLL FOR NEXT