Parbhani Rain Update : परभणी, हिंगोली जिल्ह्यातील सर्व ८२ मंडलांत मंगळवारी (ता. १८) सकाळी आठ पर्यंतच्या २४ तासांत हलका ते मध्यम पाऊस झाला. परभणी जिल्ह्यात सरासरी १४.५ तर हिंगोली जिल्ह्यात सरासरी १५.५ मिलिमीटर पाऊस झाला. उघडिपीमुळे ताण बसलेल्या पिकांना दिलासा मिळाला आहे. अनेक मंडलांतील रखडलेल्या पेरण्यासाठी दमदार पावसाची गरज आहे.
परभणी जिल्ह्यातील सर्व ५१ मंडलांत अत्यंत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. परभणी, जिंतूर, सेलू, पालम, पूर्णा तालुक्यातील अनेक मंडलांत पावसाचा जोर राहिला. आजवर १०० मिलिमीटर पेक्षा कमी पाऊस झालेल्या काही मंडलांत चांगला पाऊस झाल्यामुळे पेरण्या सुरु होऊ शकतात. जिल्ह्यात गेल्या २४ तासांत सरासरी १४.५ मिमी, जुलै महिन्यात आजवर सरासरी ८९.७ मिमी तर १ जूनपासून एकूण सरासरी १४५.२ मिमी (५३.३ टक्के) पाऊस झाला.
हिंगोली जिल्ह्यातील सर्व ३० मंडलांत हलका पाऊस झाला. हिंगोली, कळमनुरी, वसमत, औंढा नागनाथ तालुक्यांतील काही मंडलांत पावसाचा जोर राहिला. जिल्ह्यात गेल्या २४ तासांत सरासरी १५.५ मिलिमीटर तर जुलैमध्ये एकूण सरासरी १२७.४ मिमी तर १ जूनपासून एकूण सरासरी १७२.५ मिलिमीटर (५६.९ टक्के) पाऊस झाला.
परभणी जिल्हा ः परभणी १८, पेडगाव १६, जांब ११, झरी २२.५, सिंगणापूर १४.८, दैठणा १८.३, पिंगळी १९.८, परभणी ग्रामीण २४, टाकळी कुंभकर्ण २२.५, आडगाव २३, दूधगाव २२.५, चिकलठाणा २५.५, मोरेगाव २७.५, मानवत १०.३, केकरजवळा ११, पाथरी १०.८, बाभळगाव ११, आवलगाव १७.५, शेळगाव १३, वडगाव १२.५, गंगाखेड १४, महातपुरी १२.३. माखणी १३, राणीसावरगाव १२, पालम १४.८, चाटोरी १२.३, बनवस ११.५.
हिंगोली जिल्हा ः हिंगोली १०.५, नरसी नामदेव २८.५, सिरसम ३१.३, बासंबा २२.५, डिग्रस कऱ्हाळे १६.८, माळहिवरा २५.५, खंबाळा १९, कळमनुरी१५.३, नांदापूर १६.८,वसमत १३.५, गिरगाव १८.३ ,हट्टा ३०.५. टेंभुर्णी २७.३, औंढा नागनाथ २३, येळेगाव १६.५, साळणा २३, जवळा बाजार १०.५, गोरेगाव १३.८.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.