Crop Damage Agrowon
ताज्या बातम्या

Crop Damage Survey : तत्काळ पंचनामे करून भरपाईसाठी प्रयत्न करू

आमदार रणजितसिंह मोहिते- पाटील यांनी माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागाचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी प्रत्यक्ष नुकसानग्रस्त भागात जाऊन पिकांची पाहणी केली. शेतकऱ्यांच्या भेटी घेतल्या व त्यांना दिलासा दिला.

Team Agrowon

नातेपुते : आमदार रणजितसिंह मोहिते- पाटील यांनी माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागाचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी प्रत्यक्ष नुकसानग्रस्त भागात जाऊन पिकांची पाहणी केली. शेतकऱ्यांच्या भेटी घेतल्या व त्यांना दिलासा दिला.

नुकसानग्रस्त भागाचे लवकरच पंचनामे (Crop Damage Survey) करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी शासनाकडे प्रयत्न करू, असे ते यावेळी म्हणाले.

माळशिरस तालुक्यातील पश्चिम भागात शनिवारी (ता. १८) झालेल्या गारपिटीमुळे हजारो एकर ऊस, द्राक्ष, डाळिंब, पपई, मका, गहू, बाजरी, शेवगा व कडवळ पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

आमदार मोहिते- पाटील यांनी या नुकसानग्रस्त भागाचा दौरा करून पिकांची पाहणी केली.

आमदार मोहिते- पाटील यांनी इस्लामपूर, माणकी, भांब, गिरवी व रेडे या गावांना भेट दिली. या गावात सुमारे अर्धा तास गारपीट झाली.

‘शिवामृत’चे संचालक लक्ष्मण पवार यांनी सांगितले की, इस्लामपूर परिसरातील ४०० एकर ऊस, १०० एकर मका, ३० एकर  गहू, १० एकर द्राक्ष, ३ एकर शेवगा व ३ एकर कारले पिकांचे नुकसान झाले आहे.

माणकीचे माजी सरपंच संग्राम रणवरे यांनी सांगितले की, माणकी परिसरातील ऊस, द्राक्ष, डाळिंब, मका, पपई, गहू व हरभरा पिकांचे सुमारे १०० हेक्टरचे नुकसान झाले आहे.

भांबचे प्रगतशील शेतकरी विश्वास सिद यांनी सांगितले की, भांब परिसरातील मका ६० हेक्टर, बाजरी १० हेक्टर, कडवळ ३० हेक्टर, गहू १० हेक्टर व डाळिंब १० हेक्टर पिकांचे नुकसान झाले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pest Outbreak: हवामान बदलामुळे वाढला विषारी सुरवंटांचा प्रादुर्भाव

Indigenous Cattle Breeding: शाश्‍वत शेतीसाठी देशी गोवंश संवर्धन

Sharad Pawar Meets PM Modi: शरद पवार, सुप्रिया सुळेंनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट, अचानक भेटीमुळे राजकीय वतुर्ळात चर्चा, नेमकं कारण काय?

Modern Fruit Plantation: फळझाडे लागवडीसाठी आधुनिक यंत्रे

Agriculture Machinery: जुन्या रिक्षा इंजिनापासून बहुउपयोगी कृषी यंत्र

SCROLL FOR NEXT