Dhule Z. P. Agrowon
ताज्या बातम्या

Dhule Z. P. : ‘झेडपी’त अध्यक्षांकडून लेटलतिफांची कानउघाडणी

कार्यालयात उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांना अध्यक्षा श्रीमती पाटील यांनी खडे बोल सुनावत कार्यालयीन वेळ पाळा अन्यथा कारवाई करेन, असा इशारा दिला.

Team Agrowon

धुळे ः जिल्हा परिषदेच्या (Dhule zp ) अध्यक्षा अश्‍विनी पाटील (Ashwini Patil) यांनी जिल्हा परिषदेतील विविध विभागांना भेट देत अधिकारी-कर्मचाऱ्यांची हजेरी घेतली. त्यामुळे ही धावपळ, तारांबळ होती.

दरम्यान, कार्यालयात उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांना अध्यक्षा श्रीमती पाटील यांनी खडे बोल सुनावत कार्यालयीन वेळ पाळा अन्यथा कारवाई करेन, असा इशारा दिला. दरम्यान, श्रीमती पाटील यांनी धुळे पंचायत समितीतही भेट देत पाहणी केली.

जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीमती पाटील यांनी सोमवारी (ता. १६) सकाळी सव्वादहाच्या सुमारास जिल्हा परिषदेच्या विविध विभागात भेट देऊन हजेरी घेण्यास सुरवात केली. कार्यालयात जाऊन हजेरीपत्रक तपासणे सुरू केले.

यात विविध विभागांत काही कर्मचाऱ्यांनी हजेरी रजिस्टरमध्ये स्वाक्षरी केली नसल्याचे आढळले, तर काही महाभागांनी अॅडव्हान्समध्ये अर्थात पुढच्या आठवड्याच्या स्वाक्षरी करून ठेवल्याचेही अध्यक्षा श्रीमती पाटील यांच्या निदर्शनास आले.

हा प्रकार पाहिल्यानंतर श्रीमती पाटील चांगल्याच संतापल्या व त्यांनी संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांना खडे बोल सुनावले.

सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन कामाच्या वेळा पाळाव्यात, कामात बेशिस्तपणा खपवून घेणार नाही, अशी तंबी देत अन्यथा संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा दिला.

दरम्यान, अध्यक्षा श्रीमती पाटील यांच्या या अचानक पाहणीमुळे ऑफिसमध्ये न पोचलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना निरोप मिळाल्यानंतर त्यांची चांगलीच तारांबळ उडाली. खासगी कामाने बाहेर गेलेले कर्मचारी धावपळ करत कार्यालयात पोचले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Beed Farmer Protest: वेळकाढूपणा थांबवा आणि थेट निर्णय घ्या

Women Farmers: सृष्टी व्यवस्था अन् महिलांचे अनोखे नाते

Maharashtra Drought Management: नवा दुष्काळ,जुनीच व्यवस्था

Interview wih Dattatray Bharane: काळ कठीण, पण सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी

Okra Jassid Infestation: भेंडीवरील तुडतुड्यांची समस्या

SCROLL FOR NEXT