Rainfall
Rainfall Agrowon
ताज्या बातम्या

Weather Update: जून महिन्यामध्ये ५३ मंडलांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस

माणिक रासवे : अॅग्रोवन वृत्तसेवा

परभणीः यंदाच्या (२०२२) पावसाळ्यात जून महिन्याची सरासरी आणि प्रत्यक्ष झालेला पाऊस (Rain) यात परभणी जिल्ह्यात ८.२ मिमी आणि हिंगोली जिल्ह्यात ४७.५ मिमी एवढी तूट आली आहे. परभणी जिल्ह्यातील २७ मंडले आणि हिंगोली जिल्ह्यांतील २६ मंडळे मिळून या दोन जिल्ह्यांतील ५३ मंडलांमध्ये पावसाने सरासरी गाठली नाही. या दोन जिल्ह्यांतील नऊ मंडलांमध्ये जून महिन्याच्या सरासरीच्या तुलनेत ५० टक्क्यांहून कमी पाऊस झाला आहे.

गतवर्षीच्या (२०२१) जून महिन्यात परभणी जिल्ह्यात २४९.६ मिमी (१७१.८ टक्के) आणि हिंगोली जिल्ह्यात २५०.७ मिमी (१४८.२ टक्के) पाऊस (Rain) झाला होता. गतवर्षीच्या तुलनेत यंदा परभणी जिल्ह्यात ११२.५ मिमी आणि हिंगोली जिल्ह्यात १२९ मिमी एवढा कमी पाऊस (Rain) झाला आहे. जून महिन्याची परभणी जिल्ह्याची पावसाची सरासरी १४५.३० मिमी आहे, परंतु यंदा प्रत्यक्षात १३७.१ मिमी (९४.६ टक्के) पाऊस झाला.

जिल्ह्यातील ५२ पैकी २५ मंडलांममध्ये सरासरीपेक्षा जास्त, तर २७ मंडलांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस (Rain) झाला आहे. जांब, जिंतूर, हादगाव, कासापुरी या चार मंडलांत सरासरीच्या ५० टक्क्यांहून कमी पाऊस झाला आहे.

सरासरीपेक्षा कमी पाऊस झालेली मंडळे (कंसात टक्केवारी) : परभणी (६३.५ टक्के), पेडगाव (५८.४), जांब (३६.७), झरी (५०.४), सिंगणापूर (९५.६), दैठणा (८८.२), पिंगळी (८५.९), परभणी ग्रामीण (८१.१), टाकळी कुंभकर्ण (६३.५), जिंतूर (४८.७), सावंगी म्हाळसा (७२.९), बामणी (५०.५), बोरी (७६.५), आडगाव (८३.४), दूधगाव (९५.७), सेलू (८२), वालूर (५६.३), कुपटा (५२.८), चिकलठाणा (८३), मोरेगाव (८३.६), मानवत (९६.१), केकरजवळा (८५.६), पाथरी (७९.४), हादगाव (३४.७), कासापुरी (३९.५), चाटोरी (८७.६), रावराजूर (९९.५).

सरासरीपेक्षा जास्त पाऊस झालेली मंडले (कंसात टक्केवारी) : चारठाणा (१००.४ टक्के), वाघी धानोरा (११०.३), देऊळगाव गात (१४१.८), कोल्हा (१२२.५), ताडबोरगाव (१०५.६), रामपुरी (१२०), बाभळगाव (१३०), सोनपेठ (१२७.५), आवलगाव (१३८.९), शेळगाव (११३.४), वडगाव (१६४.७), गंगाखेड (१९६.३), महातपुरी (१६५.६), माखणी (१६५.६), राणी सावरगाव (११७.५), पिंपळदरी (१७६.४), पालम (१२९.४), बनवस (११२.१), पेठशिवणी (१७५.२), पूर्णा (१६१), ताडकळस (१०६.२), लिमला (१३०.७), कात्नेश्वर (११९.९), चुडावा (१३२.१), कावलगाव (१२१.७ टक्के).

हिंगोली जिल्ह्याची जून महिन्याची पावसाची सरासरी १६९.२० मिमी आहे, परंतु प्रत्यक्षात १२१.७ मिमी (७१.९ टक्के) पाऊस (Rain) झाला. जिल्ह्यातील ३० पैकी केवळ ४ मंडलांमध्ये सरासरीपेक्षा जास्त, तर २६ मंडलांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. हिंगोली, वाकोडी, डोंगरकडा, गिरगाव, सेनगाव या पाच मंडलांमध्ये सरासरीच्या ५० टक्क्यांहून कमी पाऊस (Rain) झाला.

सरासरीपेक्षा कमी पाऊस झालेली मंडळेः हिंगोली (३९.३ टक्के), सिरसम (६६.९), बासंबा (६३.५), डिग्रस कऱ्हाळे (६७.७), माळहिवरा (९९.८), कळमनुरी (५२.४), वाकोडी (४९), नांदापूर (९१.७), आखाडा बाळापूर (६२.४), डोंगरकडा (४४.७), वारंगा (९४.५), वसमत (७८.८), आंबा (६२.८), गिरगाव (३३.२), हट्टा (६१.६), टेंभुर्णी (७८.८), कुरुंदा (८८.१), औंढा नागनाथ (७६.४), साळणा (७६.४), जवळा बाजार (८५.२), सेनगाव (४८.९), गोरेगाव (९६.२), आजेगाव (७५.८), साखरा (४८.६), पानकनेरगाव (६२.२), हत्ता (६७.२).

सरासरीपेक्षा जास्त पाऊस झालेली मंडळेः नरसी नामदेव (१२७.४ टक्के), खंबाळा (१०६.९ टक्के), हयातनगर (१०३.६ टक्के), येळेगाव (१४६ टक्के)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sadabhau Khot : 'आधी कडकनाथवर बोला', भर सभेत शेतकऱ्यांचा सदाभाऊ खोतांना सवाल

Onion Export Ban : केंद्र सरकारच्या चलाखीमुळे कांदा निर्यातीवरील लगाम कायम; शेतकऱ्यांना कितीपत फायदा होणार?

Kolhapur Water Shortage : गावांना टँकरद्वारे पाण्याची गरज, लोकप्रतिनिधी, प्रशासन निवडणुक कामात व्यस्थ

Agriculture Industry : उद्योगाच्या घरी रिद्धी-सिद्धी...

Success Story : अल्पभूधारकांच्या शेतात फुलली हिरवाई

SCROLL FOR NEXT