पुणे : महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने (Maharashtra Preoperative Bank ) २०२१-२०२२ या आर्थिक वर्षात मिळविलेल्या ६०३ कोटी रुपये इतक्या भरीव नफ्याच्या (Bank Profit) पार्श्वभूमीवर वार्षिक सर्वसाधारण सभेत सभासदांना दहा टक्के लाभांशास (Dividend) एकमताने मान्यता देण्यात आली.
बँकेची १११ वी वार्षिक सर्वसाधारण सभा मुंबई येथील मुख्य कार्यालयात ३० जून रोजी प्रत्यक्ष पार पडली. प्रारंभी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांनी आर्थिक वर्षात केलेल्या प्रगतीचा आढावा घेतला. तसेच, विषय पत्रिकेवरील प्रत्येक विषयांवर सभासदांनी विचारलेल्या सर्व शंकांचे निरसन केल्यानंतरच एकमताने सर्व विषय मंजूर करण्यात आले. सभेत अडचणीतील साखर कारखाने व सहकारी संस्थांसाठी सामोपचार कर्ज परतफेड योजनेस एकमताने मंजुरी देण्यात आली.

अडचणीतील साखर कारखाने व इतर सहकारी संस्थांना कर्ज अनुत्पादक कर्जाच्या वर्गवारीत गेल्यापासून दसादशे सहा टक्के दराने सरळव्याज पद्धतीने तडजोड रक्कम पुढील चार वर्षांत भरण्याची मुभा देण्यात आली. यासाठी पहिल्या तीन वर्षांसाठी ७ टक्के व चौथ्या वर्षाकरिता ८ टक्के व्याजदराने व्याजाची आकारणी करण्यात येईल. तसेच, नियमित परतफेड करणाऱ्या संस्थेला एक टक्का व्याजामध्ये सूट देण्यात येणार आहे, असे अनास्कर यांनी सांगितले.
सलग आठव्यांदा ऑडिट वर्ग ‘अ’
राज्य सहकारी बॅंकेत अनुत्पादित कर्जाचे प्रमाण ‘शून्य’ टक्के आहे. तसेच, बँकेला सलग आठ वेळा ऑडिट वर्ग ‘अ’ प्राप्त झाला आहे. त्यामुळे सभासदांनी बँकेच्या प्रशासनाचा अभिनंदन करण्याचा ठराव एकमताने मंजूर केला.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.