Water Dam
Water Dam Agrowon
ताज्या बातम्या

Water Crisis : राज्यातील ६५ धरणांत ८० टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा

संदीप नवले : अॅग्रोवन वृत्तसेवा

Pune News : पावसाचे जवळपास साडेतीन महिने लोटले आहे. या काळात राज्यातील अनेक धरणक्षेत्रात अजूनही दमदार पाऊस पडलेला नाही. गेल्या एक महिन्यात पाऊस न पडल्याने राज्यातील ६५ धरणे भरतील की नाही अशी शंका निर्माण झाली आहे.

विशेष म्हणजे उजनी, जायकवाडी, मुळा, मांजरा, माजलगाव या धरणांतही पुरेसा पाणीसाठा झालेला नाही. धरणक्षेत्रात अजूनही पुरेसा पाऊस नसल्याने ६५ धरणांत ८० टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा आहे. त्यामुळे आगामी काळात पाणीटंचाई जाणवण्याचा अंदाज जलसंपदा विभागाच्या सूत्रांनी वर्तविला आहे.

यंदा जुलैमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे राज्यातील धरणांत पाण्याची मोठी आवक झाली. राज्यात जलसंपदा विभागाकडील लहान, मध्यम व मोठे अशा एकूण दोन हजार ९९४ प्रकल्पांत १४२२.१२ टीएमसीपैकी तब्बल ९८९.५४ टीएमसी (२८०२९.०० दशलक्ष घनमीटर) एवढा म्हणजेच ६९ टक्के पाणीसाठा झाला आहे.

गेल्या वर्षी याच काळात ८८.८० टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत जवळपास १९ टक्क्यांने हा पाणीसाठा कमी आहे. येत्या काळात पुरेसा पाऊस न झाल्यास आगामी काळात पाण्याची मोठी टंचाई भासण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

राज्यात मॉन्सून दाखल झाल्यानंतर पश्‍चिम घाटमाथ्यावर व पूर्व विदर्भात, मराठवाड्यात काही जिल्ह्यात अतिवृष्टी झाली होती. त्यामुळे धरणांत चांगलीच आवक झाली. जूनमध्ये अखेरच्या दहा दिवसांत नव्याने एकूण ३० टीएमसी पाण्याची आवक झाली होती. परंतु जुलै महिन्यात जवळपास १७ तारखेपर्यंत काहीशी उघडीप होती. त्यानंतर पावसाने राज्यातील विविध भागांत दमदार हजेरी लावली. त्यामुळे ओढे, नाले, नद्यांनी पातळी ओलांडल्याने धरणांत मोठ्या प्रमाणात पाणी दाखल झाले.

त्यामुळे पाणीपातळी झपाट्याने वाढल्याने कोकणातील आणि पश्‍चिम महाराष्ट्रातील काही धरणे भरली आहेत. त्यामुळे धरणांत जवळपास ७७० टीएमसीपर्यंत पाणीसाठा दाखल झाला होता. यामुळे धरणांतील पाणीसाठा वेगाने वाढल्याने काही धरणे भरून वाहिल्याने पाणीसाठा ५० टक्क्यांहून अधिक झाला होता. त्यानंतर ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये पावसाने काही प्रमाणात उघडीप देण्यास सुरुवात केली. मागील दोन दिवसांपासून राज्यातील काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडत आहे.

मोठ्या प्रकल्पांत ७५ टक्के पाणीसाठा

राज्यात कोयना, जायकवाडी, वारणा, उजनी, मुळा, पवना अशी जवळपास १३९ मोठी धरणे आहेत. या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात हलका ते मध्यम पाऊस झाल्याने नवीन पाण्याची बऱ्यापैकी आवक झाली आहे. साडेतीन महिन्यांत मोठ्या धरणांतील पाणीसाठा ७७९.८५ टीएमसी म्हणजेच सरासरी ७५.९८ टक्के पाणीसाठा झाला आहे. गेल्या वर्षी या प्रकल्पात ९५ टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत चालू वर्षी जवळपास २० टीएमसीने घट झाली आहे.

विभागनिहाय धरणांत झालेला पाणीसाठा (टीएमसीमध्ये)

विभाग ---संख्या --- पाणीसाठा --- टक्के

नागपूर --- ३८३ -- १३७.६८ --- ८४.६६

अमरावती -- २६१ --- १०२.०१ --- ७६.५५

छत्रपती संभाजीनगर -- ९२० --- ८३.०९ -- ३२.४२

नाशिक --- ५३५ -- १४८.०२ -- ७०.६३

पुणे --- ७२० -- ३९६.०२ -- ७३.७९

कोकण --- १७३ --- १२२.७१ --- ९३.८१

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Loan : शेतकऱ्यांना ९६ टक्के पीककर्जाचे वितरण

Group School : समूह शाळेचा पहिला प्रयोग नागपुरात

Tomato Farming : शेतकरी वळताहेत टोमॅटो पिकाकडे

PM Kisan : ‘पीएम किसान, नमो किसान’वर बहिष्‍कार सुरू

Sudhir Mungantiwar : साप वन्यजीव नसल्याने भरपाई देता येणार नाही

SCROLL FOR NEXT