Weather Update Agrowon
ताज्या बातम्या

Weather Update : गारठा कमी, उकाड्यात वाढ

राज्याच्या कमाल, किमान तापमानात चढ-उतार सुरूच आहेत. उत्तर महाराष्ट्र वगळता उर्वरित राज्याच्या किमान तापमानात चांगलीच वाढ झाल्याने गारठा कमी झाला आहे.

टीम ॲग्रोवन

पुणे : राज्याच्या कमाल, किमान तापमानात (Temperature) चढ-उतार सुरूच आहेत. उत्तर महाराष्ट्र वगळता उर्वरित राज्याच्या किमान तापमानात चांगलीच वाढ झाल्याने गारठा (Cold) कमी झाला आहे. कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात ढगाळ हवामान (Cloudy Weather) झाल्याने उकाडाही वाढला आहे. आज (ता. २६) विदर्भात गारठा वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र निवळल्यानंतर असलेली चक्राकार वाऱ्यांची स्थिती अरबी समुद्र आणि केरळच्या किनाऱ्यालगत असून, या वाऱ्यामुळे समुद्रावरील बाष्पयुक्त वारे कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि लगतच्या मराठवाड्याकडे येत आहे.

या भागात ढगाळ हवामान होत असून, किमान तापमानात वाढ होण्याबरोबरच दिवसा उकाडा जाणवू लागला आहे. उत्तर अंदमान समुद्रात समुद्र सपाटीपासून ३.१ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार झाली आहे.

उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीचा कडाका वाढतच असून, राजस्थानमधील चुरू येथे शुक्रवारी (ता. २५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये देशाच्या सपाट भूभागावरील सर्वांत नीचांकी ५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर धुळे येथील कृषी महाविद्यालयात १० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

उर्वरित राज्यात बहुतांशी ठिकाणी किमान तापमानाचा पारा १३ अंशांच्या पुढे गेल्याने गारठा कमी झाला आहे. उत्तर महाराष्ट्रासह राज्याच्या काही भागात पहाटे गारठा कायम आहे. आज (ता. २६) राज्यात कोरड्या हवामानासह किमान आणि कमाल तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता आहे. तर विदर्भात गारठा वाढण्याचे संकेत आहेत.

शुक्रवारी (ता. २५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :

पुणे ३१.८ (१५.९), नगर (१७.१), जळगाव ३१ (१५.७), धुळे ३० (१०), कोल्हापूर ३१ (२१.५), महाबळेश्‍वर २६.८(१६.६), नाशिक ३०.४ (१३.४), निफाड ३०.१ (११.२), सांगली ३१.५ (२०.४), सातारा ३१.५ (२०.४), सोलापूर ३२.८ (२१.७), सांताक्रूझ ३३.३ (२०.६), डहाणू ३०.१ (१९.३), रत्नागिरी ३४ (२३.१), औरंगाबाद ३०.६ (१३.४), नांदेड - (१७), परभणी ३१.१ (१५.६), अकोला ३२.४ (१४.२), अमरावती ३१.२ (१४.५), बुलडाणा ३१.६ (१४.२), ब्रह्मपुरी ३२.३ (१३.९), चंद्रपूर २९.२ (१५.४), गडचिरोली ३१.२(१३), गोंदिया २८.८(११.५), नागपूर ३०.२ (१२.७), वर्धा ३०.२ (१३.६), वाशीम ३०.८ (१२.६), यवतमाळ ३१(१२.५).

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dapoli Joint Agresco 2026: दापोली येथे आजपासून तीन दिवस ‘जॉइंट ॲग्रेस्को’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते होणार उद्‍घाटन

Shaktipeeth Highway: ‘शक्तिपीठ’च्या बोजामुळे पीककर्जाचा मार्ग बंद

Kharif Crop Crisis: पावसाने दडी मारल्याने पिके धोक्यात

Ganeshkhind Agricultural Research Centre: गणेशखिंड संशोधन केंद्रास कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची भेट

Iran Defence Strategy: इराणकडून क्षेपणास्त्र क्षमतेत वाढ

SCROLL FOR NEXT