Leopard Terror  Agrowon
ताज्या बातम्या

Leopard : उंडवडी परिसरात बिबट्याची दहशत

उंडवडीत मोठे ऊस क्षेत्र, नदीच्या पुरतटावर वाढलेले कुबाभूळ व इतर वृक्षांचे दाट जंगल यामुळे बिबट्याला येथे लपण्यासाठी व अधिवासासाठी चांगली जागा उपलब्ध झाली आहे.

टीम ॲग्रोवन

यवत ः उंडवडी (ता. दौंड) परिसरात बिबट्याची दहशत (Leopard Terror) पसरली आहे. मागील दोन महिन्यांत अकरांहून अधिक पाळीव प्राण्यांचा जीव बिबट्याने (Bibatya) घेतल्याचे येथील नागरिक सांगत आहेत. वनविभागानेही (Forest Department) त्यास दुजोरा दिला आहे. लोकांच्या मनात वाढत्या भीतीची दखल घेऊन आमदार राहुल कुल (MLA Rahul Kool) यांनी वन विभागाला उपाय योजना करण्याबाबत सूचना केल्या असल्याचेही सांगण्यात आले.

उंडवडीत मोठे ऊस क्षेत्र, नदीच्या पुरतटावर वाढलेले कुबाभूळ व इतर वृक्षांचे दाट जंगल यामुळे बिबट्याला येथे लपण्यासाठी व अधिवासासाठी चांगली जागा उपलब्ध झाली आहे. मात्र असे असले तरी त्याच्या खाण्याची गरज हे जंगल किंवा ऊस क्षेत्र भागवू शकत नाही. त्यामुळे या बिबट्यांनी अन्नासाठी पाळीव प्राण्यांना लक्ष केले आहे. मागील अनेक दिवसांपासून दौंड तालुक्यातील नदीलगतच्या व ऊस क्षेत्र असलेल्या भागात बिबट्यांचा वावर वाढला आहे. वन विभागाने वेळोवेळी केलेल्या पाहणीतही याची खात्री झालेली आहे.

मात्र या बिबट्यांना पकडण्यासाठी क्वचितच व्यवस्था केली जाते. उंडवडी परिसरात शेतीसोबत दुग्धोत्पादन मोठ्या प्रमाणात केले जाते. त्यामुळे पाळीव जनावरांची संख्या मोठी आहे. बिबट्याच्या हल्ल्यात जनावांराचा जीव जात आहे. परिसरातील नागरिक मोठ्या दहशतीखाली आहेत. ग्रामपंचायतीकडून वन विभागाला पत्रही देण्यात आले आहे, असे उंडवडीच्या सरपंच दीपमाला जाधव यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Monsoon Rain: मराठवाड्यात २ दिवस पावसाचा अंदाज; मध्य महाराष्ट्र, कोकणातही काही ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता

Sangli Rainfall: सांगली जिल्ह्यात पावसाची टक्केवारी घटली

Local Body Elections: आता दिवाळीनंतरच होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका; राज्य निवडणूक आयोग

Transformer Issues: बागायती पिकांत सिंचनास वेग, अनेक रोहित्र नादुरुस्त

Crop Insurance: जळगावात कापूस पीकविमा परतावा प्रलंबित

SCROLL FOR NEXT