मेहुणबारे, जि.जळगाव ः ऊसतोडणी (Sugarcane Harvesting) सुरू असताना, मजुरांना बिबट्याचे एक नवजात पिल्लू (Leopard Cub) आढळले होते. त्याच्या आईने पिलाला सुरक्षित स्थळी घेऊन जावे, यासाठी प्रयत्न केले. मात्र, त्यातील काही पिलांना नेल्यावर एका पिलासाठी मादी फिरकलीच नाही. अखेर माय-लेकरांची कायमची ताटातूट झाली. त्याच पिलाचा मृत्यू (Leopard Cub Death) झाला.
या पिलाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, हे शवविच्छेदन अहवाल आल्यावर कळणार आहे. आपल्या पिलासाठी कासावीस झालेल्या मादी बिबट हल्ला करण्याची भीती व्यक्त होत असून, तिचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे. शिंदवाडी (ता. चाळीसगाव) शिवारातील भऊर-जामदा रस्त्यालगतच्या दयानंद सोनवणे यांच्या शेतात उसतोड सुरू होती.
ऊसतोड कामगारांना शेतात बिबट्याचे एक पिल्लू आढळून आले. त्यानंतर तेथे वन विभागाचे वनपरीक्षेत्र अधिकारी शीतल नगराळे, मानद वन्यजीव रक्षक राजेश ठोंबरे यांच्यासह वन विभागाचे कर्मचाऱ्यांनी बिबट्याचे पिल्लू ज्या उसाच्या शेतात आढळून आले, त्या उसाची तोड थांबवली व तो परिसर निर्मनुष्य केला. बिबट्याच्या पिल्लाचे डोळे उघडे झाले नव्हते. मादी बिबट्याने या पिलाला नुकताच जन्म दिलेला होता.
पिलाला त्या जागेवर ठेवायचे
उसतोडीच्या आवाजामुळे मादी बिबट आपल्या दुसऱ्या पिलाला घेऊन कुठेतरी चालली गेली, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. उसाच्या शेतात ज्या ठिकाणी पिल्लू सापडले, त्या ठिकाणी ते पिल्लू ठेवले जात होते. मात्र, आपले पिल्लू घेण्यासाठी त्याची आई त्या जागेवर फिरकलीहीच नाही. नेहमीप्रमाणे या पिल्लाला उसाच्या शेतात ठेवण्यात आले.
मात्र, रविवारी (ता. ४) सकाळी वन विभागाचे कर्मचारी त्या पिल्लाला घेण्यासाठी गेले असता, ते मृतावस्थेत आढळले. डोळेही न उघडलेल्या पिलाला सांभाळण्याची जबाबदारी ही वन विभागाचीच होती. मात्र, या पिलाचा मृत्यू कशामुळे झाला, याचे कारण समजू शकले नाही. या पिल्लाच्या मृत्यूचे कारण शवविच्छेदन अहवाल आल्यावरच समजू शकेल, अशी माहिती वन विभागाने दिली.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.