Leopard : शिदवाडीत आढळला बिबट्याचे बछडे

जामदा-भऊर रस्त्यावरील शिदवाडी (ता. चाळीसगाव) शिवारात ऊसतोड सुरू असताना मजुरांना बिबट्याचे बछडे आढळून आले.
Leopard
LeopardAgrowon
Published on
Updated on

मेहुणबारे, जि. जळगाव ः जामदा-भऊर रस्त्यावरील शिदवाडी (ता. चाळीसगाव) शिवारात ऊसतोड सुरू असताना मजुरांना बिबट्याचे बछडे (Leopard) आढळून आले. त्यामुळे ऊसतोड कामगारांमध्ये एकच खळबळ उडाली. त्यानंतर मजूर भीतीने लगेच उसाच्या (Sugar Cane) फडातून बाहेर पडले. या घटनेची माहिती वन विभागाला देण्यात आल्यानंतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तेथे धाव घेऊन परिसर निर्मनुष्य केला.

Leopard
Farmer Incentive Scheme : पहिल्या यादीतील २८८ जणांचे आधार प्रमाणीकरण अजूनही बाकी

या बछड्यांचे डोळेही उघडलेले नव्हते. त्यामुळे नुकताच मादी बिबट्याने या बछड्याला जन्म दिला असावा, असा वन विभागाचा कयास आहे. त्यामुळे या ठिकाणी मादी बिबट आपल्या बछड्याच्या आशेने येण्याची शक्यता असल्याने शेतात वन विभागाकडून दोन ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले आहेत. घटनास्थळी वन विभाग नजर ठेवून असून, दोन वन कर्मचारीदेखील तैनात करण्यात आले आहे. मेहुणबारे येथे शिदवाडी शिवारात भऊर-जामदा रस्त्यालगत दयानंद निवृत्ती सोनवणे यांच्या शेतात ऊसतोड सुरू आहे.

ऊसतोड कामगार शेतात ऊसतोडीसाठी गेले होते. एक मजूर उसावर कोयत्याचा घाव घालणार तोच त्यांना बिबट्याचे बछडे आढळून आले. या प्रकाराने ऊसतोड कामगार घाबरले व सर्व कामगार उसाच्या फडाबाहेर पडले. या घटनेची माहिती वन विभागाला दिल्यानंतर वनपरीक्षेत्र अधिकारी शीतल नगराळे, वन्यजीव रक्षक राजेश ठोंबरे, वनरक्षक अमित पाटील, आश्‍विनी ठाकरे, संजय चव्हाण, श्रीराम राजपूत, बाळू शितोळे, राहुल मांडोळे यांनी धाव घेतली व परिसराची पाहणी केली.

दोन ट्रॅप कॅमेरे लावले

हे बछडे नर जातीचे आहेत. मादी बिबटने रात्री केव्हा तरी बछड्यांना जन्म दिला असावा. ऊसतोड कामगारांच्या आवाजामुळे मादी बिबट कुठेतरी गेली असावी, असा कयासही वन विभागाचा असून, या पार्श्‍वभूमीवर ही मादी बिबट आपल्या बछड्याच्या आशेने पुन्हा तेथे येऊ शकते, हे लक्षात घेऊन या शेतात दोन ट्रॅप कॅमेरे वन विभागातर्फे लावण्यात आले असून, परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी दोन वन कर्मचारी गस्त घालत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com