नाशिक : वारकरी, भाविकांना विठ्ठल दर्शनाची ओढ लागलेली आहे. अशात आषाढी एकादशीला पंढरपूर दर्शनासाठी भाविकांची गर्दी होत असते. जिल्हास्तरावरून पंढरपूरला जाणाऱ्या वारकरी, भाविकांच्या सेवेत ‘लाल परी’ धावणार आहे. एसटी महामंडळाच्या (Maharashtra State Transport Corporation) नाशिक विभागातर्फे ७ ते १४ जुलै या कालावधीत पंढरपूरसाठी २६० जादा बसगाड्या सोडल्या जाणार आहेत.
विविध आगारांतील यात्रा केंद्रातून या बसगाड्या सुटतील. कोरोना महामारीचा प्रादुर्भावामुळे यापूर्वी वारी प्रभावित झालेली होती. अशात या वर्षी वारकरी, भाविकांमध्ये उत्साह बघायला मिळतो आहे. १० जुलैला आषाढी एकादशी (Ashadhi Ekadashi) असल्याने या दरम्यानच्या कालावधीत वारकरी, भाविक दर्शनासाठी पंढरपूरला (Pandharpur) दाखल होत असतात.
या भाविकांच्या सुविधेसाठी जादा बस उपलब्ध असणार आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या नाशिक विभागातर्फे ६ जुलैपासून जिल्हापातळीवरून २६० जादा बसगाड्या सोडल्या जातील. पंढरपूरसाठी (Pandharpur) सोडल्या जाणाऱ्या या बसगाड्या १४ जुलैपर्यंत भाविक प्रवाशांच्या सेवेसाठी उपलब्ध राहतील.
या केंद्रांवरून जादा बसगाड्या
आगार...बस स्थानके
नाशिक...महामार्ग बस स्थानक
मालेगाव... मालेगाव नवीन बस स्थानक, रावळगाव
सटाणा... नामपूर, देवळा, ताहाराबाद, सटाणा
मनमाड...मनमाड, चांदवड
सिन्नर...सिन्नर, वावी
लासलगाव... लासलगाव, विंचूर, निफाड, चांदोरी
नांदगाव... नांदगाव
इगतपुरी... इगतपुरी, घोटी
येवला...येवला
कळवण... कळवण, वणी
पेठ...पेठ
पिंपळगाव बसवंत...पिंपळगाव बसवंत, ओझर
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.