Kolhapur Farmer Peak Vima agrowon
ताज्या बातम्या

Kolhapur Farmer Peak Vima : कोल्हापूरचे शेतकरी नंबर वन, एकही बोगस पीक विमा धारक नाही

Farmer Peak Vima : पीक विमा १ रुपयात करण्यात आल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या लाभासाठी तब्बल ५५ हजार शेतकऱ्यांनी नोंद केली.

sandeep Shirguppe

Kolhapur Farmer News : पीक विमा १ रुपयात करण्यात आल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या लाभासाठी तब्बल ५५ हजार शेतकऱ्यांनी नोंद केल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान मागच्या काही वर्षात बोगस पीक विमा उतरवणाऱ्याची संख्या मोठ्या प्रमाणात आढळून यायची.

याबाबत कोल्हापूर जिल्हा कृषी विभागाने पडताळणी केली असता यात एकही शेतकरी बोगस विमा उतरविणारा सापडलेला नाही. कोल्हापुरातील शेतकरी प्रामाणिकपणे काम करतो हेच यातून दिसून येते.

दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यानंतर कंपन्यांनी टाळाटाळ केल्यास शेतकरी कोणाकडे दाद मागणार हा प्रश्न उपस्थित होत आहे. राज्यात बीड, लातूर, छत्रपती संभाजीनगर यासह मराठवाड्यात सर्वाधिक पीक विमा उतरविला जातो.

मराठावाड्यात अस्मानी संकटाचा मोठ्या प्रमाणात धोका असल्याने या भागात पीक विम्याचे प्रमाण जास्त आहे. दुष्काळ गारपीटमुळे येथील शेती बेभरवशाची झाली आहे. त्यातही बीड जिल्ह्यात सर्वाधिक पीक विमा उतरला जातो.

राज्यात पीक विम्याचा बीड पॅटर्न प्रसिद्ध आहे. यंदाच्या खरीप हंगामात जवळपास ९ लाख ८४ हजार शेतकऱ्यांनी पीक विम्यात सहभाग घेतला होता. दरम्यान बीडमध्ये बोगस पीक विमा भरलेले शेतकरी आढळून आल्याने राज्यात एकच खळबळ उडाली होती. त्यामुळे संपूर्ण व महाराष्ट्रात चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार कृषी विभागाने कोल्हापूर जिल्ह्यात चौकशी केली असता, यामध्ये एकही बोगस पीक विमा धारक सापडला नाही.

याबाबत कोल्हापूर जिल्हा कृषी अधिकारी दत्तात्रय दिवेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, शासनाच्या आदेशानुसार जिल्ह्यातील पीक विमा काढलेल्या खात्यांची चौकशी करण्यात आली. यामध्ये एकही खाते बोगस आढळले नाही. या खरीप हंगामात उच्चांकी पीक विमा काढणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या आहे.

तालुकानिहाय पीक विमा काढलेले शेतकरी आजरा ५२३८, गगनबावडा २७८२, भुदरगड १९८० चंदगड ७४३२, गडहिंग्लज ६५४८, हातकणंगले ४३१६, कागल २८६० करवीर ६११०, पन्हाळा ३८५२, राधानगरी ८१०३ शाहूवाडी ३०७६, शिरोळ ३००४ असे आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pomegranate Export : राज्यातून डाळिंब निर्यातीसाठी २१ हजार शेतकऱ्यांची नोंदणी

MahaDBT Portal : ‘महाडीबीटी’वरील अर्जांची नऊ महिन्यांपासून सोडतच नाही

Banana Rate : केळीची कमी दराने खरेदी सुरूच कारवाईसत्र राबविण्याची मागणी

Onion Purchase Investigation : कांदा खरेदीची केंद्राकडून चौकशी सुरू

Raisins Deal : पेमेंट द्या; अन्यथा सौद्यात सहभाग नाही

SCROLL FOR NEXT