Chandoli Dam agrowon
ताज्या बातम्या

Chandoli Dam : चांदोली धरण शंभर टक्के भरले, काही दिवस जोरदार पावसाचा इशारा

Chandoli Dam : चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचे आगमन झाले असून, चोवीस तासांत ३७ मिलिमीटर पाऊस झाला.

sandeep Shirguppe

Kolhapur Sangli Chandoli Dam : चांदोली धरण आज सकाळी सातला १०० टक्के भरले. ३४. ४० टीएमसी साठवणक्षमता असणारे वारणा धरण पूर्ण क्षमतेने भरण्याकडे लाभक्षेत्राशिवाय लातूर, सोलापूर जिल्ह्याचे लक्ष होते. पावसाने महिनाभर विश्रांती घेतल्याने धरण पूर्ण क्षमतेने भरून घेण्यासाठी धरण प्रशासनाने वीजनिर्मिती ठप्प केली होती. सध्या वारणा डावा कालवा प्रवाहित ठेवला असून, वाकुर्डे उपसा जलसिंचन योजना कार्यान्वित केली आहे.

धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचे आगमन झाले असून, चोवीस तासांत ३७ मिलिमीटर पाऊस झाला. पाणलोट क्षेत्रातून ३७७० क्युसेक पाण्याची आवक सुरू आहे. आवक पाण्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी बंद असणारी वीजनिर्मिती जनित्रे सुरू ठेवून ४५७ क्युसेक पाण्याचा विसर्ग वारणा नदीपात्रात सुरू आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात जोरदार पाऊस

कोल्हापूर जिल्ह्यात मागच्या तीन दिवसांपासून पावसाने हजेरील लावत शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा दिला. १८ तारखेपासून जिल्ह्यात कमी जास्त प्रमाणात पाऊस होत असल्याने खरिपासह, ऊस पिकाला चांगलाच दिलासा मिळाला आहे.

मागच्या तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्याने उष्णतेचे प्रमाण असले तरी अधूनमधून पाऊस होत होत आहे. काही तासांच्या अंतराने पावसाची जोरदार सरी येत असल्याने शेतकऱ्यांना तूर्त दिलासा मिळाला आहे.

राज्यासह जिल्ह्यात हवामान विभागाने आणखी जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. जिल्ह्यात आजही सर्वदूर पाऊस झाला. मात्र, हातकणंगले आणि शिरोळ तालुक्यात अपेक्षित पाऊस अद्यापही झालेला नाही. शाहूवाडी, गगनबावडा, राधानगरी, आजरा, चंदगड, कागल आणि करवीर लागली.

तालुक्यात चांगला पाऊस झाल्याने समाधान व्यक्त केले जात आहे. करवीर तालुक्यातील पूर्व भागात असणाऱ्या गावांमध्ये जोरदार तर काही ठिकाणी कमी प्रमाणात पावसाची नोंद झाली. दरम्यान मागच्या दोन दिवसांपासून घाटमाथ्यावर मात्र जोरदार पाऊस होत आहे. राधानगरी, चंदगड, शाहूवाडी, पन्हाला या तालुक्यात जोरदार पाऊस होत आहे. यामुळे भात, नाचणी या पिकांना चांगलीच उभारी मिळाली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Chana Market Rate: सध्या हरभऱ्याचा भाव हमीभावापेक्षा ८०० ते ११०० रुपयांपेक्षा कमी

Irrigation Management: सिंचन व्यवस्थापन अराजकतेच्या वळणावर

Smart Farming: पपई- मिरची- खरबूज पद्धतीतून उत्पन्नाचा हुकमी स्रोत

Dairy Farming Success Story: दुग्ध व्यवसाय हेच झाले माझे विश्‍व

Fertilizer Subsidy: खत अनुदान थेट शेतकऱ्यांना देणे शक्य; डीबीटी यंत्रणा उभारण्याच्या कृषिमंत्र्यांच्या सूचना

SCROLL FOR NEXT