Kolhapur Radhanagari Dam agrowon
ताज्या बातम्या

Kolhapur Radhanagari Dam : कोल्हापुरातील राधानगरी धरणाचे दरवाजे बंद पण पंचंगंगेच्या पाणी पातळीत वाढ

Kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यात मागच्या २४ तासांपासून पावसाने चांगलीच उघडीप दिल्याने शेती मशागतीच्या कामांना चांगलाच वेग मिळाला आहे.

Team Agrowon

Kolhapur News : कोल्हापूर जिल्ह्यात मागच्या २४ तासांपासून पावसाने चांगलीच उघडीप दिल्याने शेती मशागतीच्या कामांना चांगलाच वेग मिळाला आहे. याचबरोबर राधानगरी धरणाचे पाचही स्वयंचलित दरवाजे बंद झाले.

यामुळे कोल्हापूरकरांना दिलासा मिळाला असला तरी कालपासून पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत ८ इंचांनी वाढ झाली आहे. तसेच कोल्हापूर - पन्हाळा मार्गावर केर्लीजवळ, तर कोल्हापूर - राधानगरी मार्गावर हळदीजवळ पाणी आल्याने वाहतूकीस अडथळा येत होता.

जिल्ह्यातील घाटमाथ्यावरील धरण क्षेत्रातही पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने राधानगरी धरणाचा तिसऱ्या क्रमांकाचा दरवाजा पहाटे ४ वाजून ४ मिनिटांनी बंद झाला. यामुळे धरणाच्या चार दरवाजांतून दिवसभर ७,११२ क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता.

रात्री आठ वाजता चौथ्या आणि सातव्या क्रमांकाचा, तर ८ वाजून २१ मिनिटांनी पाचव्या आणि सहाव्या क्रमांकाचे दरवाजे बंद झाले. आता फक्त १४०० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

गेल्या २४ तासांत प्रमुख १५ धरणांपैकी १० धरणांच्या पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी सदृश्य पाऊस झाला. राधानगरी (९७), तुळशी (११६), दूधगंगा (८४), कासारी (१४८), कडवी कोल्हापूर : कोल्हापूर- पन्हाळा रस्त्यावर शुक्रवारी सकाळी पाणी आले.

या (११५), कुंभी (१५९), पाटगाव (१६४), चिकोत्रा (१३०), घटप्रभा (११८) व कोदे परिसरात १३६ मि.मी. पाऊस झाला. वारणेत (४३), चित्रीत (४४), जंगमहट्टीत (३१), जांबरेत (६४), तर आंबेओहोळमध्ये ४८ मि.मी. पाऊस झाला.

पाटगाव (९५) व तुळशी (४२ मि.मी.) वगळता अन्य धरण क्षेत्रांत ३० मि.मी.पेक्षा कमी पाऊस झाला आहे. जिल्ह्यात शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजेपर्यंत गेल्या २४ तासांत सरासरी ३१ मि.मी. पाऊस झाला आहे. सर्वाधिक पाऊस गगनबावडा तालुक्यात ६३.९ मि.मी. इतका झाला. शाहूवाडीत ६०.८ मि.मी., राधानगरीत ४४.७ मि.मी. ४०.४ मि.मी. पाऊस झाला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Farming : ऊस शेतीसाठी एकात्मिक प्रयत्न हवेत : कुलगुरू डॉ. पाटील

Rare Plant : तिलारीच्या जंगलात आढळली कचूर वनस्पती

VAMNICOM : वैकुंठभाई मेहता सहकारी संस्थेला ‘त्रिभुवन’ विद्यापीठाची मान्यता

Krishi Mandal Office : नसरापुरातील कृषी मंडल कार्यालय बेपत्ता

NCPSP Mandal Yatra : ‘राष्ट्रवादी’ची आता मंडल यात्रा

SCROLL FOR NEXT