sandeep Shirguppe
कोल्हापूर जिल्ह्याला समृद्ध करणाऱ्या राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे कसे उघडतात? याबाबत सर्वानाच उत्सुकता असते. परंतु शाहू महाराजांनी याबाबत नेमंक कोणाचं मार्गदर्शन घेत काम केलं याबद्दल आपण जाणून घेणार आहोत.
राधानगरी धरणाची बांधणी छत्रपती शाहू महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली बांधकाम करण्यात आले. हे धरण भोगावती नदीवर उभारण्यात आले आहे.
राधानगरी धरणाच्या सात स्वयंचलित दरवाजांचे तंत्रज्ञान अनेक वर्षांनंतरही कायम आहे. हे तंत्रज्ञान नागरिक आणि देशभरातील अनेक अभियंत्यांसाठी प्रेरणादायी आहे.
भारतरत्न एम. विश्वेश्वरय्या यांनी या स्वयंचलित दरवाजांची रचना केली होती. आजही राधानगरी धरण येथे छत्रपती राजर्षी शाहू महाराज आणि एम. विश्वेश्वरय्या यांच्या कार्याची साक्ष स्मृती केंद्राच्या ठिकाणी म्हणून पाहिले जाते.
गुरुत्वाकर्षणाच्या सिद्धांतावर आधारित पाणी सोडण्याची व्यवस्था आणि पाण्याच्या दबावावर उघड-झाप होणार्या स्वयंचलित दरवाजांचे वैशिष्ट्य असणारे राधानगरी धरण आहे.
शाहू महाराज हे १९०२ साली परदेश दौऱ्यावर गेले होते यानंतर त्यांनी कोल्हापुरात येत धरण बांधण्याच्या निर्धार केला. पूढच्या १०० वर्षांचा दृष्टीकोन ठेवत शाहू महाराजांनी राधानगरीच्या डोंगरांगांमध्ये धरण बांधले.
२२ सप्टेंबर १९०८ रोजी राधानगरी धरणाच्या योजनेस राजर्षी शाहू महाराज यांनी मंजुरी दिली. त्याच वर्षी दसर्याच्या मुहूर्तावर प्रत्यक्ष काम सुरु केले. या योजनेचे शिल्पकार इंजिनिअर रावसो दाजीराव अमृतराव विचारे होते.
एम विश्वेश्वरय्या यांच्या मार्गदर्शनाखाली देशात ग्वाल्हेर, म्हैसूरसह, कोल्हापुरातील राधानगरी धरणावर ही यंत्रणा बसविण्यात आली.
१९०९ मध्ये धरणाच्या प्रत्यक्ष कामास सुरुवात झाली. १९१८ पर्यंत १४ लाख रुपये खर्चून धरणाचे बांधकाम पूर्ण करण्यात आले. हे बांधकाम ४० फुटांपर्यंत पूर्ण झाले.
पुढे निधीच्या कमतरतेमुळे आणि राजर्षी शाहूंच्या निधनामुळे (१९२२) राजी हे काम काही काळ रखडले. मात्र छत्रपती राजाराम महाराज यांनी आपल्या कारकिर्दीत धरणाचे अपुरे काम पुन्हा गतीने हाती घेतले.
दरम्यान राजाराम महाराज यांच्या निधनांतर अपुरे राहिलेले काम छत्रपती शहाजी महाराजांनी पूर्ण केले. १९४९ ते ५५ या काळात २.४५ लाख खर्च करून धरणाची उंची १२६ फुटांपर्यंत वाढविण्यात आली. सन १९५७ ला धरणाचे काम अंतिम टप्प्यात आले.