Kolhapur ZP agrowon
ताज्या बातम्या

Kolhapur ZP : कोल्हापूर जिल्ह्याला दुषित पाण्याचा धोका, जिल्हा आरोग्य विभागाकडून धक्कादायक आकडेवारी समोर

Kolhapur ZP Health Department : कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने पाणी सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणात धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.

sandeep Shirguppe

Kolhapur ZP : कोल्हापूर जिल्ह्यात दुषित पाण्याचा प्रश्न मागच्या कित्येक वर्षापासून प्रलंबीत आहे. विविध संस्था आणि संघटनांनी पंचगंगा प्रदुषण निर्मुलनासाठी अनेक उपक्रम राबवले परंतु पंचगंगा नदी प्रदुषणाच्या विळख्यात तशीच राहिल्याचे चित्र दिसून येत आहे.

दरम्यान कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने पाणी सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणात धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील तब्बल १८० गावांना दुषित पाणी मिळत असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान ज्या गावांचे पाणी दुषित आढळळे आहे त्या गावांना पिवळे कार्ड देण्यात आले आहे.

याचबरोबर जिल्ह्यातील जवळपास ३ ते ४ गावांत अत्यंत दुषित पाणी आढळले आहे. यातील पन्हाळा तालुक्यातील किसरूळ या ग्रामपंचायतीला लाल कार्ड देण्यात आले आहे. कोल्हापूर जिल्हापरिषदे मार्फत पत्येकवर्षी पावसाळ्याआदी आणि पावसाळा संपल्यानंतर गावाला पाणीपुरवठा होणाऱ्या जल स्त्रोतांची चाचणी घेतली जाते.

या चाचणीचा अहवाल आल्यानंतर त्याची गुणवत्ता तपासून ग्रामपंचायतींना हिरवे, पिवळे व लाल असे कार्ड जिल्हापरिषदे मार्फत दिले जाते. ज्या गावात दुषीत पाणी नाही पिण्यायोग्य पाणी असल्याचा अहवाल आल्यानंतर त्या गावांना हिरवे कार्ड दिले जाते.

दरम्यान दुषीत आणि अतिदुषीत पाणी असलेल्या गावांना पिवळे आणि लाल असे कार्ड दिले जाते. या गावांना साथीचे आजार उद्भवण्याची शक्यता असल्याने खबरदारी घेणे आवश्यक सूचनाही केल्या जातात.

राज्यात कोल्हापूर जिल्हापरिषदेकडूनच हा उपक्रम राबविला जातो. कोल्हापूर जिल्हापरिषदेच्या आरोग्य विभागाने १ हजार २५ ग्रामपंचायतींमधील ३ हजार ४०३ पाण्याच्या स्रोतांची तपासणी केली.

यामध्ये जिल्हा प्रयोगशाळेतून गावातून आणलेल्या पाण्याच्या चाचण्या करतात. यामध्ये ९१६ गावांमधील पाणी स्वच्छ तर १८० गावांमधील पाणी दूषित आढळले आहे.

यातील सर्वाधिक १९ गावे करवीर तालुक्यातील आहेत. तर आजरा, गगनबावडा व शाहूवाडी तालुक्यातील प्रत्येकी एका गावामध्ये दूषित पाणी आढळून आले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Vice President Election: जे.पी. नड्डा उपराष्ट्रपतीपदासाठी एनडीएचे अधिकृत उमेदवार; एनडीएच्या बैठकीत शिक्कामोर्तब

Hatnur Dam : ...आतापर्यंत केवळ हतनूर सिंचन प्रकल्पातूनच विसर्ग सुरू

Ladki Bahin Yojana : लाखावर ‘लाडक्या बहिणी’ लाभापासून राहणार वंचित

e-Peek Pahani : शेतकऱ्यांच्या ई-पीकपाहणीला जळगाव जिल्ह्यात गती

Banana Plantation : उशिराची मृग बहर केळी लागवड सुरू

SCROLL FOR NEXT