Water Supply Scheme : इचलकरंजी पाणी योजना रद्द करा

Water Scheme : इचलकरंजी पाणीपुरवठा योजना पूर्ण झाल्यास शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होणार आहे. नदीकाठच्या ऊस पिकांची वाताहत झाली असून बहुतांश पिके उन्हाच्या तडाख्याने करपत आहेत.
Water Supply Scheme
Water Supply SchemeAgrowon

kolhapur Water Supply Scheme News : इचलकरंजी पाणीपुरवठा योजना पूर्ण झाल्यास शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होणार आहे. नदीकाठच्या ऊस पिकांची वाताहत झाली असून बहुतांश पिके उन्हाच्या तडाख्याने करपत आहेत.

पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांकडून नदीकाठच्या गावांना पाणी कमी पडणार नाही, अशी आश्वासने दिली जात असताना जी आकडेवारी सांगितली गेली त्यातून काय सिद्ध होत आहे, असा सवाल करीत परिस्थितीचे गांभीर्य ओळखा. इचलकरंजी योजना रद्द करा, अशी मागणी दूधगंगा बचाव कृती समितीने केली.

Water Supply Scheme
Water Supply Scheme : भोकर मतदार संघातील नागरिकांना मिळणार शुद्ध पाणी

सुळकूड (ता. कागल) येथे संभाव्य उपसाबंदी, काळम्मावाडी धरणातील अपुरा पाणीसाठा व इचलकरंजी पाणीपुरवठा योजनेला विरोध यासंदर्भात सुळकूड ग्रामपंचायतीमध्ये दूधगंगा बचाव कृती समितीची बैठक झाली.

या वेळी समितीच्या कार्यकर्त्यांनी तीव्र भावना व्यक्त केल्या. दूधगंगा नदीकाठ जूनमध्येच कोरडा पडला आहे. कोल्हापूरची थेट पाईपलाईन व इचलकरंजी पाणी योजना झाल्यास चित्र कसे असेल, याचा विचार राज्यकर्त्यांनी करावा.

दुष्काळसदृश परिस्थिती झाली आणि पाऊस लांबला तर आम्हाला हक्काच्या पाण्यापासून वंचित राहावे लागेल. आम्हाला पाणी मिळणार नसेल तर इतरांनी आमच्या पाण्यावर हक्क का सांगावा. सोयीस्कर राजकारणासाठी योजना लादू नये. इचलकरंजी योजनेसाठी अनेकवेळा आंदोलने केली आहेत. यापुढेही लढा आणखी तीव्र करू, असा इशारा या वेळी देण्यात आला.

या वेळी अमोल शिवई, अरुण मुद्दांना, विजय आरेकर, वीरगोंडा टेळे, अविनाश मगदूम यांनी मनोगते व्यक्त केली. बैठकीस उपसरपंच शरद धुळुगडे, बापूसो पाटील, चंद्रकांत पाटील, महेंद्र पाटील, विक्रमसिंह माने, चंद्रकांत धामंना आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com