e-Peek Pahani : शेतकऱ्यांच्या ई-पीकपाहणीला जळगाव जिल्ह्यात गती

e-Crop Survey : ई-पीकपाहणीसाठी ॲपमधील जुने व्हर्जन काढून नवे व्हर्जन डाऊनलोड करण्याच्या सूचना देण्यात आल्या. अनेक शेतकरी जुन्याच व्हर्जनवर ई-पीकपाहणीचा प्रयत्न करीत होते.
E Crop Registration
E Peek Pahani Agrowon
Published on
Updated on

Jalgaon News : ई-पीकपाहणीबाबत यंदा शेतकऱ्यांमध्ये बऱ्यापैकी कार्यवाही सुरू आहे. काही तालुक्यांचा अपवाद वगळता इतर भागात याबाबत चांगला प्रतिसाद मिळत असल्याची स्थिती आहे. ई-पीकपाहणीसाठी ॲपमधील जुने व्हर्जन काढून नवे व्हर्जन डाऊनलोड करण्याच्या सूचना देण्यात आल्या. अनेक शेतकरी जुन्याच व्हर्जनवर ई-पीकपाहणीचा प्रयत्न करीत होते.

शेतकऱ्यांनी ई-पीकपाहणी करावी व व्हर्जन-२ नव्याने डाऊनलोड करावे, अशा सूचना दिल्या. शेतकरी विविध योजनांचे लाभ, पीककर्ज यासाठी पीकपाणी हवे तसे नसतानाही पीकपाहणी करून घेत आहेत. पाऊस नाही. पण ई-पीकपाहणीशिवाय पर्याय नाही. अन्यथा पीकपेरा होणार नाही, याची भीती शेतकऱ्यांना आहे.

E Crop Registration
E-Peek Pahani : फळपीक विम्यासाठी ई-पीकपाहणी करणे बंधनकारक

जळगाव जिल्ह्यात सुमारे १५ हजार शेतकऱ्यांनी पीक लागवडीसंबंधी ई-पीकपाहणी केली आहे. जिल्ह्यात सात लाख ६७ हजार हेक्टरवर खरिपातील पिकांची लागवड अपेक्षित होती. यात ९४ टक्के पेरणी झाली आहे. कापसाची सर्वाधिक चार लाख ७० हजार हेक्टरवर लागवड झाल्याचे प्रशासनाने मध्यंतरी म्हटले होते.

ई-पीकपाहणीसाठी ग्रामपंचायतींच्या सहकार्याने कार्यवाही व्हावी. ग्रामपंचायतींत नियुक्त ऑपरेटरला ॲण्ड्रॉई़ड मोबाइल उपलब्ध करून द्यावा व शेतकऱ्यांना सहकार्य करावे, असाही मुद्दा उपस्थित केला जात आहे.

E Crop Registration
E-Peek Pahani : शेतकऱ्यांचा ई-पीक पाहणीला कमी प्रतिसाद

एकाच शेतकऱ्याला २० वेगवेगळ्या क्षेत्रांवरील पीक पाहणी करता येणे या ॲपमध्ये शक्य आहे. तलाठी ई-पीकपाहणीची सक्ती करीत आहेत. आपल्याला अधिकारच नाहीत, असे शेतकऱ्यांना सांगितले जात आहे.

पण यात वृद्ध, निरक्षर शेतकऱ्यांची अडचण होत आहे. अपवादात्मक स्थितीत तलाठ्यांनादेखील ई-पीक पाहणीचे अधिकार दिले जावेत, असा मुद्दाही उपस्थित केला जात आहे. जिल्ह्यात यावल, रावेर, मुक्ताईनगर, चोपडा भागात ई-पीकपाहणीस प्रतिसाद मिळाल्याची माहिती आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com