Sugar Factory Election agrowon
ताज्या बातम्या

Sugar Factory Election : सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकांची रणधुमाळी होणार सुरू, कोल्हापुरात काटे की टक्कर!

sandeep Shirguppe

Maharashtra cooperative elections : राज्य शासनाने पावसाचे कारण पुढे करत राज्यातील तब्बल ८१ हजार ६३१ संस्थांच्या निवडणुका ३० सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलल्या आहेत. दरम्यान पुढच्या आठवड्यापासून राज्यातील सहकारी साखर कारखाने, पतसंस्था, दुधसंस्था, सोसायट्यांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू होण्याची शक्यता असून त्याची तयारी सहकार विभागाने सुरू केली आहे.

दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यातील १९१० दुग्ध-संस्था, ६२ बँका आणि पतसंस्था तर बिद्री, भोगावती, आजरा, उदयसिंगराव गायकवाड, इंदिरा महिला या सहकारी साखर कारखान्यांच्या निवडणुकांची बिगूल वाजण्याची शक्यता आहे.

करवीर तालुक्यातील परिते येथील भोगावती सहकारी साखर कारखान्यांची निवडणूक प्रक्रिया उमेदवारी अर्जापर्यंत पूर्ण झाली आहे. छाननी बाकी असतानाच स्थगिती आल्याने आता छाननीपासून प्रक्रिया सुरू होणार आहे. तर जिल्ह्यातील महत्वाची मानली जाणाऱ्या बिद्री (ता. कागल) येथील दूधगंगा वेदगंगा कारखान्यांची अंतिम यादी प्रसिद्ध झाली होती.

आता थेट उमेदवारी अर्ज दाखल होणार आहेत. तर आजरा कारखान्याचीही अंतिम यादी प्रसिद्ध झाली असून 'उदयसिंगराव गायकवाड' व 'इंदिरा महिला तांबाळे' यांचीही प्रारूप यादीची प्रक्रिया सुरू होणार आहे. मागच्या दोन महिन्यांपूर्वी निवडणुकांना स्थगिती दिल्याने काही काळ प्रचाराचा झंजावात शांत झाला होता.

दरम्यान आता पुन्हा निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्याने भोगावती', 'बिद्री'चा प्रचार सुरु झाला आहे. यामध्ये आमदार प्रकाश अबीटकर, माजी आमदार के.पी. पाटील यांच्यात बिद्री कारखान्यात जोरदार रंगत पहायला मिळणार आहे.

तर काँग्रेस आमदार पी.एन. पाटील यांच्या भोगावती कारखान्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष जर्नादन पाटील यांच्यासह विरोधकांनी मोट बांधण्याचे काम सुरू केले आहेत. भोगावती आणि बिद्रीच्या विरोधकांनी सत्तारुढ गटाच्या कारभारावरच आसूड ओढले असून त्याच ताकदीने सत्तारुढ गटाने उत्तर देण्याचे काम सुरू आहे.

दुग्ध विभागाची होणार कसरत

कोल्हापूर जिल्ह्यात सहकाराचे जाळे मोठे असल्याने दूध संस्थाही मोठ्या प्रमाणात आहेत. दरम्यान जिल्ह्याचील सहाव्या टप्यातील १९१० त्यापाठोपाठ सुमारे ४५० संस्थांच्या निवडणुका होत आहेत. दुग्धविभागातील मनुष्यबळ पाहता अधिकाऱ्यांची दमछाक होणार असल्याच दिसून येत आहे. आठवड्याला १०० ते १२५ प्रारूप याद्यांचे कार्यक्रम लावण्याची तयारी दुग्ध विभागाने केली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Crop : वाढलेल्या सोयबीनमध्ये शेंगांचा शोध

Agricos Welfare Society : ‘कृषी’च्या विद्यार्थ्यांकडून सेवाभावी संस्थेला मदत

E-Peek Pahani : छप्पन टक्के शेतकऱ्यांनी नोंदविली ई-पीकपाहणी

Crop Damage Compensation : नांदेडमधील शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई

Integrated Agriculture : एकात्मिक शेती पद्धतीच्या यशस्वी मॉडेलचा प्रसार व्हावा

SCROLL FOR NEXT