Kisan Sabha Agrowon
ताज्या बातम्या

Kisan Sabha : शासनाने आश्‍वासने पाळण्यासाठी किसान सभेचे गाव पातळीवर निदर्शने

Kisan Sabha News : हिरडा खरेदी त्वरित सुरू करणे, हिरड्याला रास्ता हमीभाव देणे व हिरडा नुकसान भरपाईची रक्कम त्वरित अदा व्हावी, याविषयी राज्य शासनाने आश्‍वासन दिलेली आहेत.

Team Agrowon

ॲग्रोवन वृत्तसेवा
Kisan Sabha Protest: पुणे : हिरडा खरेदी (Hirda Procurement) त्वरित सुरू करणे, हिरड्याला रास्ता हमीभाव देणे व हिरडा नुकसान भरपाईची रक्कम त्वरित अदा व्हावी, याविषयी राज्य शासनाने आश्‍वासन दिलेली आहेत.

ती त्वरित पूर्ण करावे, यासाठी आंबेगाव तालुका किसान सभेच्या वतीने तालुक्यातील गोठेत खू.,अडविरे, चिखली, जांभोरी, राजपूर अशा निवडक गावात निदर्शने करून मागण्यांचे निवेदन ग्रामसेवक यांच्याकडे मंगळवारी (ता. ६) सुपूर्द केले.

आंबेगाव तालुका किसान सभेच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले होते. पुढील काळात राज्य शासनाने दिलेली आश्‍वासने त्यांनी पाळली नाही तर तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा किसान सभेचे पुणे जिल्हा सहसचिव अशोक पेकारी यांनी दिला आहे.

या आंदोलनाचे नेतृत्व अशोक पेकारी यांनी केले होते. या वेळी राजू घोडे, रामदास लोहकरे, अशोक जोशी मच्छिंद्र वाघमारे, दत्ता गिरंगे, देविका भोकटे, सुनीता लोहकरे, संगीता लोहकरे, राजू बांबळे, सुनील लोहकरे, अशोक पारधी, नंदाराम आढारी, दगडू भोमाळे आदी उपस्थित होते.

अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वाखाली, शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी दिंडोरी ते वाशिंद असा पहिला लाँग मार्च आणि मागील महिन्यात, दुसरा लाँग मार्च अकोले ते संगमनेर झाला.

यामध्ये पुणे जिल्ह्यातील जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यातील हिरडा उत्पादक शेतकऱ्यांच्या हिरड्याला आधारभाव देऊन हिरडा खरेदी केंद्र तातडीने सुरू करणे, जून २०२० रोजी निसर्ग चक्रीवादळाने नुकसान झालेल्या आणि पंचनामे केलेल्या हिरडा उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी.

या दोन्ही मागण्या शासनाने मान्य केल्या होत्या. परंतु अद्यापपर्यंत राज्य शासनाने याबाबत कार्यवाही सुरू केलेली दिसत नाही.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Yavatmal Crop Insurance : यवतमाळच्या विम्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ

Crop Insurance Scheme: नांदेडमध्ये पीकविमा योजनेत ९ लाखांहून अधिक अर्ज

Irrigation Projects : रखडलेल्या सिंचन प्रकल्पांना गती

Farm Loan Waiver: कर्जमाफी रक्कम वितरणास विलंब का? सहकारमंत्र्यांनी सांगितलं कारण

Mechanized Paddy Transplantation: यंत्राने भात लागवडीकडे वाढता कल

SCROLL FOR NEXT