Shepherd Agrowon
ताज्या बातम्या

Kharif Season : पाऊसच नाही, तर गावाकडे जाऊन करणार काय?

Rain Update : नगर, पुणेच नाही, तर राज्यातील अनेक भागांत पाऊस नसल्याने गावांकडं जाऊन काय करणार, पाणी नाही, चारा नाही. जित्राब जगवणं अवघड झालंय, अशी भावना मेंढपालांनी व्यक्त केली.

Team Agrowon

Ahmednagar News : ‘पावसाळा सरला की दिवाळीच्या काळात शेळ्या-मेंढ्या घेऊन गाव सोडतो. पावसाळ्याच्या तोंडावर गावकडं जातो. यंदा पावसाळा सुरू होऊन तीन महिने होत आलं. अजूनबी पाऊस नाही. पाऊसच नाही तर गावांकडं जाऊन काय करणार, पाणी नाही, चारा नाही. जित्राब जगवणं अवघड झालंय.

पाऊस पडल्याशिवाय आता गावाकडं जाणार नाही. अशीच भटकंती करून जनावरं जगवू.’’ श्रीगोंदा तालुक्यातील आढळगाव परिसरात शेळ्या-मेंढ्या घेऊन भटकंती करणाऱ्या मेंढपाळांनी आपली भावना व्यक्त केली. नगर, पुणेच नाही, तर राज्यातील अनेक भागांत पाऊस नसल्याचे सांगून त्यांनी दुष्काळीची दाहकता स्पष्ट केली.

पुणे, नगरसह अन्य भागांतील मेंढपाळ भटकंती करतात. पुणे जिल्ह्यातील जेजुरी, सासवड भागांतील मेंढपाळ हे शेतकरीच. शेळ्या -मेंढ्याचे पालन करणे, राज्यातील विविध भागात फिरून त्यांना जगवणे हा पारंपरिक आणि जुना व्यवसाय. दर वर्षी दिवाळीनंतर शेळ्या-मेंढ्या घेऊन भटकंतीला निघतात. पुणे, नाशिक, नगर, औरंगाबाद, बीड आदी भागांतून मजल-दरमजल करत सहा-सात महिन्यांच्या भटकंतीनंतर पुन्हा पावसाळा सुरू झाला की गावी येतात.

गेल्या वर्षी घर सोडलेले अनेक मेंढपाळ यंदा अजूनही घरी आलेले नाहीत. सातशे मेंढ्याचा कळप घेऊन जात असलेले मेंढपाळ दोन दिवसांपूर्वी श्रीगोंदा तालुक्यात भेटले. भेटलेल्या मेंढपाळांनी दुष्काळीची दाहकता स्पष्ट केली.

यंदा पुण्यापासून नाशिक, नगर, बीड, औरंगाबाद अशा कोणत्यांच भागात चांगला पाऊस नाही. जोरदार पाऊस झाला तर मेंढ्यांना पाणी, माळरानावर चारा उपलब्ध होतो. तो चारा अगदी मार्चपर्यंत पुरतो. यंदा पावसाळ्यातच चारा नाही, प्यायला पाणी नाही, आताच जित्राब जगायची चिंता आहे. पुढच्या काळात, म्हणजे उन्हाळ्यात कसे दिवस काढणार आम्ही पाऊस पडला की गावी-घरी जातो. यंदा अजूनही पाऊस नाही तर घरी जाऊ काय करणार, असे सांगत यंदाचा दुष्काळ गंभीर आहे असल्याची स्पष्टता व्यक्त केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Health Scheme: मोफत उपचार असताना रुग्णालयांनी पैसे उकळले, ३३८ प्रकरणी कारवाई, आरोग्यमंत्र्यांची विधानसभेत माहिती

IAS Varsha Meena: उष्मालाट दक्षतेबाबत व्यापक जनजागृती करा : जिल्हाधिकारी मीना

Carbon Sequestration: कर्ब साठवणूक : कार्बन अर्थव्यवस्थेची संधी

LPG Shortage: पाचगणीत पर्यटन व्यवसायाला गॅस टंचाईची ‘झळ’

Ganeshrao Deshmukh: ग्रामीण अर्थकारण बळकटीशिवाय विकसित भारत संकल्पना अपूर्ण : गणेशराव देशमुख

SCROLL FOR NEXT