Road Issue
Road Issue Agrowon
ताज्या बातम्या

Rural Road Issue : कळमण रस्त्याचे डांबरीकरण निकृष्ट

Team Agrowon

सोलापूर : सोलापूर ते साखरेवाडी (ता. उत्तर सोलापूर) या रस्त्यापैकी गावडी दारफळ ते कळमण या रस्त्याचे डांबरीकरण (Road Work) सुरू आहे. हे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे (Rural Road Issue) असून या रस्त्याचा वापर सुरू होण्यापूर्वी खडी उघडी पडली आहे.

सोलापूर ते साखरेवाडी हा रस्ता उत्तर सोलापूर (Solapur), मोहोळ (Mohal) व माढा या तीन तालुक्यातील नागरिकांसाठी अत्यंत जवळचा मार्ग आहे.

सध्या सोलापूर - बार्शी या रस्त्याचे काम उत्कृष्ट पद्धतीने पूर्ण झाले आहे. यामुळे गावडी दारफळ ते वाळूज (ता. मोहोळ) या रस्त्याअभावी या तीन तालुक्यातील जनतेचे हाल सुरू आहेत.

भोगावती नदीतील पाणी संपल्यानंतर साधारणे जानेवारी ते ऑगस्ट या काळात वाळूज (ता. माहोळ) धानोरे, मानेगाव (ता. माढा) भैरववाडी, मनगोळी येथील नागरिकांसह कळमण, साखरेवाडी, भागाईवाडी, शेरेवाडी तसेच मुंगशी या परिसरातील नागरिकांसाठी सोलापूर येण्याचा हा जवळचा मार्ग म्हणून या रस्त्याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो

मात्र, या रस्त्यावर नव्याने सुरू झालेले डांबरीकरण अत्यंत निकृष्ट दर्जाचे आहे. गावडी दारफळ ते कळमण या मार्गावरील नव्याने सुरू डांबरीकरण झालेल्या रस्त्यावरील खडी रस्त्याचा वापर सुरू होण्यापूर्वीच उखडली आहे.

या बाबत जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

साखरेवाडी ते वाळूज डांबरीकरणाची गरज

साखरेवाडी (ता. उत्तर सोलापूर) ते वाळूज (ता. मोहोळ) या रस्त्यावर स्वातंत्र्यानंतर एकदाही डांबरीकरण करण्यात आले आहे. १९७२ मध्ये केलेल्या खडीकरणाच्या रस्त्यावरूनच सोलापूर- वाळूज ही एसटी बस सेवा सुरू आहे.

वाळूज (ता. मोहोळ) येथे भोगावती नदी व काटओढा येथे पुलाची आवश्यकता आहे. हे दोन्ही पूल झाल्यास माढा व मोहोळ तालुक्यातील नागरिकांना सोलापूर येण्यासाठीचे अंतर कमी होणार आहे.

उत्तर सोलापूर तालुक्यातील आमचे भागाईवाडी हे शेवटचे गाव आहे. गावकऱ्यांचे नियमित सोलापूरला येणे जाणे असते. या मार्गाशिवाय आमच्या गावाला दुसरा मार्गच नाही. मात्र, आम्हाला कधी चांगल्या रस्त्याचा लाभ होत नाही. कारण कधी सरसकट डांबरीकरण करण्यात येत नाही. कुठेतरी एक दोन किलोमीटर डांबरीकरण करण्यात येते. तोपर्यंत पूर्वीचा रस्ता खराब झालेला असतो. एकावेळी चांगल्या दर्जाचा रस्ता तयार करण्यात यावा.
कविता घोडके पाटील, माजी सरपंच, भागाईवाडी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT