Sorghum sowing Agrowon
ताज्या बातम्या

Jowar sowing : खानदेशात ज्वारी पेरणीत किंचित वाढ

ज्वारीचे दर मागील वेळेस टिकून होते. दादर ज्वारीला मागील हंगामात कमाल तीन हजार रुपये प्रतिक्विंटलचे दर मिळाले होते. पाऊसमान चांगले होते.

Team Agrowon

जळगाव ः खानदेशात दादर ज्वारीचे पीक (Dadar Jowar) जोमात आहे. यातच संकरित व कमी कालावधीत येणाऱ्या ज्वारी वाणांची (Jowar Sowing) पेरणीदेखील सुरूच आहे. ज्वारीचे क्षेत्र किंचित वाढेल, अशी स्थिती आहे.

ज्वारीचे दर मागील वेळेस टिकून होते. दादर ज्वारीला मागील हंगामात कमाल तीन हजार रुपये प्रतिक्विंटलचे दर मिळाले होते. पाऊसमान चांगले होते.

यामुळे हुकमी पीक असलेल्या कोरडवाहू दादर ज्वारीची पेरणी अपेक्षेएवढी किंवा सर्वसाधारण क्षेत्राएवढी झाली. त्यात संकरित, विद्यापीठांकडून संशोधित ज्वारीच्या वाणांची पेरणीदेखील बऱ्यापैकी झाली आहे.

तसेच सध्या कमी कालावधीत येणाऱ्या संकरित ज्वारी वाणांची पेरणी सुरू आहे. त्याच्या बियाण्याचा तुटवडा तयार झाल्याची स्थिती आहे. कारण ज्वारी पेरणीनंतर किंवा जानेवारीत वाढेल, याची कंपन्या, कृषी केंद्रचालकांना अपेक्षा नव्हती.

खानदेशात दरवर्षी ६० ते ६५ हजार हेक्टरवर दादर ज्वारी (कोरडवाहू) व संकरित, संशोधित ज्वारीची पेरणी केली जाते. यंदा ही पेरणी ७० हजार हेक्टरपेक्षा अधिक होईल, असा अंदाज आहे.

दादर ज्वारीचे पीक निसवले आहे. त्यात दाणे पक्व होत आहेत. दुसरीकडे ज्वारीची पेरणी सुरू आहे. अर्थात, ज्वारीचा हंगाम एप्रिलपर्यंत असणार आहे.

सध्या कृत्रीम जलसाठाधारक शेतकरी संकरित ज्वारीची पेरणी काळ्या कसदार, मध्यम जमिनीत करीत आहेत. चाऱ्याचे दर टिकून राहतील. तसेच पशुधन बाजार पूर्ववत झाले आहेत.

शिवाय तृणधान्यासंबंधी जनजागृती शासन करीत आहे. त्यामुळे ज्वारीस मागणीदेखील राहणार आहे. यामुळे शेतकरी आता अखेरच्या टप्प्यात ज्वारी पेरणीला पसंती देत असल्याचे चित्र आहे.

दोन वेळेस सिंचन केल्यानंतर काळ्या कसदार जमिनीत चांगले उत्पादन देणारे ज्वारीचे वाणही बाजारात आहेत. त्यांना सध्या उठाव आहे.

ज्वारीचा कडबा किंवा कोरडा चारा किंवा कुट्टी पशुधनाला पावसाळ्यात अधिक हवी असते. तसेच हिवाळ्याच्या काळातही एक वेळेस दुधाळ पशुधनास ज्वारीची कुट्टी शेतकरी खाऊ घालतात.

यामुळे कडब्याला सर्वत्र मागणी येत आहे. पेरणी वाढल्याने उत्पादनही चांगले येईल. दादर ज्वारीचे एकरी आठ ते १० क्विंटल उत्पादन येते. तसेच काही संकरित, संशोधित ज्वारी वाण एकरी १० ते १३ क्विंटल उत्पादनही देतात.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT