Jayakwadi Dam Agrowon
ताज्या बातम्या

Jayakwadi Dam : जायकवाडीचा पाणीसाठा ४० टक्क्यांवर

Dam water level : जायकवाडी धरण क्षेत्रात पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे धरणाच्या पाणी पातळीत वाढ होऊ लागली आहे. अल्प का होईना सुरू असलेल्या आवकेमुळे बुधवारी (ता. २७) सकाळी सहा वाजता उपयुक्त पाणीसाठा ४०.२२ टक्क्यांवर पोहोचला.

Team Agrowon

Chhatrapati sambhaji nagar News : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्वांत मोठ्या जायकवाडी प्रकल्पात अल्प का होईना सुरू असलेल्या आवकेमुळे बुधवारी (ता. २७) सकाळी सहा वाजता उपयुक्त पाणीसाठा ४०.२२ टक्क्यांवर पोहोचला. त्याच वेळी प्रकल्पात १०३९२ क्युसेकने पाण्याची आवक सुरू होती. दरम्यान, डाव्या व उजव्या काव्यातून होणारा विसर्गही मंगळवारपासून (ता. २६) थांबविण्यात आला आहे.

यंदा पाणीसाठ्यांची अवस्था दयनीय आहे. गतवर्षी आजच्याच दिवशी जायकवाडी प्रकल्पात उपयुक्त पाणीसाठा जवळपास ९९.२८ टक्के होता. दरम्यान, १३ सप्टेंबरला पाण्याची आवक १८५३ क्युसेकने सुरू असताना सिंचनाच्या मागणीप्रमाणे डाव्या कालव्यातून ५०० क्युसेकने, तर उजव्या कालव्यातून ९०० क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू होता. १४ सप्टेंबरला पाण्याची आवक ११४१ क्युसेकवर आली. त्याच वेळी प्रकल्पाच्या डाव्या कालव्यातून ७०० क्युसेकने, तर उजव्या कालव्यातून ९०० क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू होता. १५ सप्टेंबरला डाव्या कालव्यातील विसर्ग १००० क्युसेक करण्यात आला, तर उजव्या कालव्यातून ९०० क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू होता. त्याच वेळी प्रकल्पात २११४ क्युसेकने पाण्याची आवक सुरू होती. १६ सप्टेंबरला प्रकल्पात पाण्याची आवक ३५ क्युसेकवर आली. तर डाव्या उजव्या कालव्यातील विसर्ग ९०० ते १००० क्युसेक दरम्यान स्थिर होता. १७ सप्टेंबरला प्रकल्पातील आवक ७५ क्युसेकवर गेली, तर विसर्ग ९०० ते १००० क्युसेकवर स्थिर होता. १८ सप्टेंबरला सकाळी सहाच्या सुमारास प्रकल्पात येणाऱ्या पाण्याची आवक थांबली होती.

डाव्या कालव्यातील विसर्ग १२०० क्युसेक करण्यात आला. उजव्या कालव्यातील विसर्ग ९०० क्युसेकवर स्थिर होता. १८ तारखेला थांबलेला विसर्ग २० सप्टेंबरपर्यंत थांबलेला होता. २१ सप्टेंबरला सकाळी सहा वाजताच्या सुमारास जायकवाडीत २४८ क्युसेकने पाण्याची आवक सुरू होती. २२ सप्टेंबरला सकाळी सहा वाजताच्या सुमारास ही आवक १२२४४ क्युसेकवर गेली. २३ सप्टेंबरला सकाळी सहा वाजताच्या सुमारास ही आवक ६०८१ क्युसेकवर आली. २४ सप्टेंबरला सकाळी ६ वाजता ही आवक पुन्हा १९२६० क्युसेकवर गेली. २४ सप्टेंबरला सायंकाळी ६ वाजता प्रकल्पातील आवक १८९८७ क्युसेकने सुरू होती. तर २५ सप्टेंबरला सकाळी ६ वाजताच्या सुमारास जायकवाडीत १५ हजार ४२७ क्युसेकने पाण्याची आवक सुरू होती. २६ सप्टेंबरला सकाळी ६ वाजता ही आवक १०१२५ क्युसेकवर आली होती. २६ सप्टेंबरला सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास प्रकल्पातील पाणीसाठा ३९ टक्क्यांवर पोहोचला होता. २४ सप्टेंबरपासून उजव्या कालव्यातील विसर्ग थांबविण्यात आला होता. २६ सप्टेंबरपासून दोन्ही कालव्यांतील विसर्ग पूर्णतः थांबविण्यात आला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Orange Management Challenge: संत्रा पट्ट्यात मोठ्या प्रमाणावर बागांची तोड

Wheat Stock Limit: केंद्र सरकारने गहू साठा मर्यादा हटविली

India US Trade Deal: अमेरिकेसोबतच्या व्यापार करारात सौदेबाजी नाही

Agri Subsidy Shortfall: कृषी अनुदान वितरणात केंद्राकडून तात्पुरती कपात

Maharashtra Weather: राज्याच्या किमान तापमानात घट शक्य

SCROLL FOR NEXT