Monsoon Forecast: उत्तर ऑस्ट्रेलियात उष्ण हंगामाची सुरुवात होत असून, त्यामुळे मॉन्सूनच्या उत्तर दिशेकडे, अर्थात भारतीय उपखंडाकडे सरकण्याच्या प्रक्रियेला गती येऊ लागली आहे. दक्षिण गोलार्धातील उष्णकटिबंधीय वातावरण निवळू लागले असताना जगभरातील हवामानशास्त्रज्ञांचे लक्ष भारतासह दक्षिण आशियातील मॉन्सूनच्या वाटचालीकडे केंद्रित झाले आहे.