Manoj Jarange  Agrowon
ताज्या बातम्या

Maratha Reservation Protest : जरांगे-पाटील यांनी अन्न, पाणी, वैद्यकीय उपचार थांबविले

Maratha Andolan : मराठा समाजाला आरक्षण मिळावे याकरिता अंतरवाली सराटी (ता. अंबड) येथे तेराव्या दिवशीही उपोषण सुरू आहे.

Team Agrowon

Jalna News : मराठा समाजाला आरक्षण मिळावे याकरिता अंतरवाली सराटी (ता. अंबड) येथे तेराव्या दिवशीही उपोषण सुरू आहे. शासन आणि शिष्टमंडळाच्या चर्चेत तोडगा न निघाल्याने मनोज जरांगे-पाटील यांनी रविवार (ता. १०)पासून अन्न, पाणी व वैद्यकीय उपचार बंद केले आहे.

शासन निर्णय काढण्यासाठी शासनाने वेळ वाढवून मागितला याबाबत श्री. जरांगे-पाटील म्हणाले, की आता एक महिना लागो नाहीतर दीड महिना, आमचे उपोषण सुरूच राहणार आहे, असे स्पष्ट केले.

यामुळे शासनाला या उपोषणाबाबत जलद हालचाली करून हा प्रश्‍न सोडवावा लागेल. शासन यामध्ये कोणती भूमिका घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

अंतरवाली सराटी येथे रविवारी डॉक्टर सेलच्या जवळपास शंभर डॉक्टरांनी जरांगे-पाटील यांची भेट घेऊन आपला पाठिंबा जाहीर केला.

या उपोषणासाठी सहभागी नागरिक यांना मोफत उपचार केले जातील, असे सांगितले. या ठिकाणी जिल्हा पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, आरोग्य विभागाचे कर्मचारी व सहकारी जरांगे-पाटील यांची भेट घेऊन तब्येतीची काळजी घेण्याचे आवाहन श्री. जरांगे यांना करत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Lumpy Skin Disease: राज्यात नऊ हजार पशुधनांना ‘लम्पी’

Rain Deficit: पावसाअभावी भाजीपाला शेतीला फटका

Silk Farming: रेशीम शेतीसाठी शेतकऱ्यांनी पुढे यावे: कोल्हे

Agricultural University Vacancy: कृषी विद्यापीठांत ५७ टक्के जागा रिक्त

PM Suryaghar Yojana: ‘सूर्यघर’चा साडेपंधरा हजार ग्राहकांनी घेतला लाभ

SCROLL FOR NEXT