Jamun Season Agrowon
ताज्या बातम्या

Jamun Season : सिंधुदुर्गात जांभूळ हंगाम तेजीत

सिंधुदुर्गनगरी जिल्ह्यात जांभूळ हंगाम तेजीत असून, जांभळाला प्रतिकिलो १०० रुपये असा दर देखील मिळत आहे.

Team Agrowon

Sindhudurg News : जिल्ह्यात जांभूळ हंगाम (Jamun Season) तेजीत असून, जांभळाला प्रतिकिलो १०० रुपये असा दर देखील मिळत आहे. त्यामुळे जांभूळ उत्पादकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. गेल्या वर्षी वादळीवाऱ्यांसह सतत पडलेल्या पावसामुळे हंगाम पूर्णतः वाया गेला होता.

जिल्ह्यातील काही गावांचे अर्थकारण आंबा, काजूसह जांभूळ पिकांवर देखील अवलंबून आहे. जिल्ह्यातील कुडाळ आणि सावंतवाडी तालुक्यांत मोठ्या प्रमाणात जांभूळ लागवड आहे. आकेरी, निरुखे, कुंदे परिसरांतील काही उत्पादकांनी नव्याने लागवड केली आहे.

गेल्या वर्षी सतत पडलेल्या अवकाळी पावसामुळे या भागातील संपूर्ण जांभूळ उत्पादन वाया गेले होते. सिंधुदुर्गातील जांभळावर प्रकिया करणाऱ्या उद्योजकांना गडचिरोलीतून जांभूळ आणावे लागले होते. त्यामुळे या वर्षी जांभूळ हंगामावर उत्पादकांना खूप अपेक्षा होती.

या वर्षी १३ मार्चपासून जांभूळ काढणीला सुरुवात झाली. सुरुवातीचे काही दिवस प्रतिकिलो ७० ते ८० रुपये दर जांभळाला मिळाला. त्यानंतर त्यामध्ये वाढ झाली असून, सध्या प्रतिकिलोला १०० रुपये दर मिळत आहे. निरुखे, आकेरी परिसरांतील जांभळांना मुंबई, पुणे, कोल्हापूर, सोलापूर बाजारपेठेमध्ये मोठी मागणी आहे.

पहिल्या टप्प्यातील जांभळाचा हंगाम येत्या आठ ते दहा दिवसांत संपेल अशी शक्यता आहे. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील हंगाम मेच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यात सुरू होईल असे शेतकऱ्यांकडून सांगितले जात आहे.

या वर्षी जांभळांचे उत्पादन समाधानकारक असून, जांभळाला दर देखील चांगला मिळत आहे. सध्या प्रतिकिलो १०० रुपये दर मिळत आहे. हाच दर आणखी काही दिवस कायम राहील. बाजारपेठेत मागणीदेखील चांगली आहे.
- अनिरुद्ध करंदीकर, जांभूळ उत्पादक शेतकरी, निरुखे, ता. कुडाळ

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Tractor GST Reduction : ट्रॅक्टरचे दर साठ हजारांपर्यंत घटणार

Lemon Rate : बाजारात लिंबाच्या दरात मोठी घट

IoT Smart Farming : 'छत्रपती'च्या कार्यक्षेत्रात स्मार्ट फार्मिंग

Rain Forecast Maharashtra : पूर्व विदर्भात विजांसह पावसाची शक्यता

Chhattisgarh Urea Supply: छत्तीसगडमध्ये शेतकऱ्यांना दिलासा; केंद्राने ६० हजार मेट्रिक टन यूरिया मंजूर केला

SCROLL FOR NEXT