Rain Update Agrowon
ताज्या बातम्या

Rain Update : देशातील या भागात पडतोय पाऊस

देशात सध्या ईशान्य माॅन्सून दाखल झाला आहे. त्यामुळे दक्षिणेतील राज्यांमध्ये तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडतोय.

टीम ॲग्रोवन

पुणे : देशात सध्या ईशान्य माॅन्सून (Northeast Monsoon) दाखल झाला आहे. त्यामुळे दक्षिणेतील राज्यांमध्ये तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस (Heavy Rainfall) पडतोय. तर राज्यातून माॅन्सून परतल्याने सकाळी गारवा तर दुपारी उन्हाचा चटका जाणवतोय. मात्र पाऊस उघडल्याने खरिपातील पिकांची (Kharip Crop) काढणी आणि रब्बी पेरणीच्या (Rabi Sowing) कामांना शेतकऱ्यांनी वेग दिलाय.

नैऋृत्य मोसमी माॅन्सून देशातून परतल्यानंतर ईशान्य माॅन्सून सक्रिय झालाय. त्यामुळे दक्षिणेतील राज्यात पाऊस पडतोय. तमिळनाडू, पुदुचेर्री, केरळ आणि आंध्र प्रदेश राज्यात पुढील दोन दिवस ठिकठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे. तसेच पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्येही अनेक भागांमध्ये जोरदार पाऊस पडत आहे. अरुणाचल प्रदेशातही बहुतांशी भागांमध्ये पाूऊस पडतोय. तर आसाम, मेघालय, नागालॅंड, मनिपूर, मिझोराम, त्रिपुरा, अंदमाण आणि निकोबार बेटांवर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे.

देशातील बहुतांशी भागांतील किमान तापमात घट झाली आहे. तर दुपारच्या कमाल तापमानातही काही भागांमध्ये घट झालेली दिसून आली. राज्यात पाऊस उघडल्यानंतर दुपारी उन्हाचा चटका वाढला. तर सकाळी थंडी जाणवत आहे. दुपारी ऊन पडत असल्याने खरिपातील पिकांची काढणी सुरु झाली. तर काही ठिकाणी रब्बीच्या पेरणीच्या तयारीनं वेग घेतलाय.

राज्यात मागील ७ ते ८ दिवसांपासून पावसाची उघडीप असल्याने शेतकऱ्यांनी सोयाबीन काढणीला प्राधान्य दिले. तसंच काही भागांमध्ये रब्बीच्या पेरण्याही सुरु झाल्या. पुढील १५ दिवसांमध्ये राज्यातील पेरण्या वेग घेतील, अशी माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Relief: शेतकऱ्यांना वीजबिल मुक्तीची पत्रे पाठविणार; मुख्यमंत्री फडणवीस

Kalyan-Latur Highway Oppose: लातूर महामार्गाला जुन्नरमध्ये तीव्र विरोध

Forest Rights Farmers Issue: वनहक्क पट्टेधारक शेतकरी ‘ॲग्रीस्टॅक’वरून ‘गायब’

Agriculture Inspection: पीक पाहणीचा पाठपुरावा करावा; ‘महसूल’च्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

Tobacco Streak Virus: कापसावर तंबाखू स्ट्रिक विषाणू ओळखा! नियंत्रणाचे उपाय काय?

SCROLL FOR NEXT