Agriculture Commodity  Agrowon
ताज्या बातम्या

Agriculture Issue : शेतकऱ्यांपर्यंत समस्यांचे समाधान पोहोचविणे गरजेचे

Dr. Sharad Gadakh : कृषी विद्यापीठात विभागीय कृषी संशोधन व विस्तार सल्लागार समितीची रब्बी व उन्हाळी हंगामासाठी पूर्व, मध्य व पश्‍चिम विदर्भासाठी सभा झाली.

Team Agrowon

Akola News : हवामान बदलाच्या या काळात शेतीविषयक समस्यांचे शाश्‍वत समाधान शोधून वेळेत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणे व त्यावर अंमलबजावणी होणे खऱ्या अर्थाने काळाची गरज असल्याचे प्रतिपादन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी केले.

कृषी विद्यापीठात विभागीय कृषी संशोधन व विस्तार सल्लागार समितीची रब्बी व उन्हाळी हंगामासाठी पूर्व, मध्य व पश्‍चिम विदर्भासाठी सभा झाली. यावेळी ते बोलत होते. तेलबिया लागवड व शेतकरी उत्पादक कंपन्याच्या माध्यमातून प्रक्रिया उद्योगाचे जाळे निर्माण करण्यासाठी कृषी विद्यापीठ, कृषी विभाग व इतर समांतर संस्थानी एकात्मिक प्रयत्नांची गरजही डॉ. गडाख यांनी मांडली.

तर पारंपरिक शेती पद्धतीमध्ये आंतरपिकांचा समावेश आणि शेतीपूरक व्यवसायाची सक्षम जोड निश्‍चितच फायदेशीर ठरत असून, व्यावसायिक शेतीची संकल्पना अवलंबिताना एकात्मिक शेती पद्धती कालसुसंगत असून, शाश्‍वत शेतीसाठी या कृषी विद्यापीठाचे प्रयत्न प्रशंसनीय असल्याचे मत ‘महाबीज’चे व्यवस्थापकीय संचालक सचिन कलंत्रे यांनी मांडले.

पुणे येथील कृषी तंत्रज्ञान आणि संशोधन संस्थेचे (अटारी) संचालक सुब्रतो रॉय यांनी कृषी विज्ञान केंद्रांच्या माध्यमातून जलद ग्रामविकास साध्य होणार असल्याचे मत व्यक्त केले. विभागीय कृषी सहसंचालक किसन मुळे व डॉ. राजेंद्र साबळे यांनी कृषी विभागाचा रब्बी व उन्हाळी हंगामाच्या नियोजनाबद्दल माहिती दिली. सभेचे सूत्रसंचालन डॉ. जे. पी. देशमुख यांनी केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ladki Bahin Yojana e-KYC: ९२ लाख लाडक्या बहिणींना धक्का, 'कॅग'चेही ताशेरे, आदिती तटकरे काय म्हणाल्या?

Ashadhi Wari 2026: माउलींच्या पहिल्या गोल रिंगणाची जय्यत तयारी

Kharif Sowing: लातुरात खरिपाच्या ४० टक्केच पेरण्या; मांजरा धरणात १७.५१ टक्के उपयुक्त पाणीसाठा

Irrigation Survey Funding Demand: रिटेवाडी उपसा सिंचनच्या सर्वेक्षणाला निधीची मागणी

Fertilizer Sale Irregularities: मेळघाटात कृषी निविष्ठांच्या विक्रीत अनियमितता

SCROLL FOR NEXT