Sangli Drought Condition agrowon
ताज्या बातम्या

Sangli Drought Condition : सांगलीच्या तासगाव तालुक्यातील शेतकरी संकटात, तहसिलदारांकडून सिंचन उपसाबंदीचे आदेश

Sangli Rain Update : सांगली जिल्ह्यात सर्वाधिक हळद आणि द्राक्ष पिकाचे उत्पादन घेतले जाते. तर तासगांव, वाळवा, शिराळा, इस्लामपूर याभागात उसाचे मोठे उत्पादन घेतले जाते.

sandeep Shirguppe

Irrigation Subvention Sangli : राज्यातील सर्वात कमी पावसाची नोंद सांगली जिल्ह्यात झाली आहे. दरम्यान पुढच्या काही दिवसांत पाऊस नाही झाल्यास जिल्ह्यातील अनेक खरिप पिके करपण्याची भिती आहे. दरम्यान सांगली जिल्ह्यात सर्वाधिक हळद आणि द्राक्ष पिकाचे उत्पादन घेतले जाते.

तर तासगांव, वाळवा, शिराळा, इस्लामपूर याभागात उसाचे मोठे उत्पादन घेतले जाते परंतु काही तालुक्यातील तहसिलदारांनी उपसाबंदीचे आदेश महावितरणला दिल्याने शेती पिके धोक्यात येण्याची भिती व्यक्त केली जात आहे.

सांगली जिल्ह्यात अत्यंत कमी पाऊस झाला आहे. याचबरोबर सांगली जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये लहान- मोठ्या प्रकल्पात असणारा पाणीसाठी कमी होत आहे. भविष्यात पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.

हे लक्षात घेऊन सध्या तासगाव तालुक्याच्या सर्वच तलावात उपसा बंदी आदेश लागू करण्यात आले आहेत. तसेच शेतीपंपाला सुरू असलेला वीजपुरवठा खंडित करण्याचे आदेश महावितरण तहसीलदारांनी दिले आहेत. दरम्यान, उपसा बंदी आदेशामुळे शेती धोक्यात येण्याची शक्यता आहे.

तासगावचे तहसीलदार रवींद्र रांजणे यांनी दिलेल्या आदेशानुसार आता उपसा बंदी लागू करण्यात आलेली आहे. तालुक्यातील अंजनी, पेड, मोराळे, पुणदी, बलगवडे, निमणी, सिद्धेवाडी या तलावातील पाणीसाठा कमी होत चालला आहे. सिंचनासाठी मोठ्या प्रमाणात पाण्याचा वापर सुरू आहे. यामुळे हा आदेश काढण्यात आला आहे.

भविष्यात पाण्याची भीषण टंचाई निर्माण होऊ शकते. खबरदारीचे उपाय म्हणून या तलावातील पाणी पिण्याच्या पाण्यासाठी राखीव ठेवणे आवश्यक आहे. याकरिता उपसा बंदी लागू केली असून वीजपुरवठा खंडित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

या आदेशामुळे तलावांवर अवलंबून असणारी शेती धोक्यात येण्याची भीती निर्माण झाली आहे. ऊस, भाजीपाला, खरीप पिके व द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. दरम्यान, तालुक्यातील सर्व पाणी योजना सुरू करून तलाव भरून घेण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ativrushti Madat: अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाईचे वितरण सुरू

Agrowon Diwali Article : आदिवासींची निसर्गपूरक शेती

Agrowon Diwali Article: शाश्‍वत शेती पद्धतीशिवाय पर्याय नाही

Soybean MSP : हमीदर ५३२८ रुपयांचा खरेदी केली केवळ ५०० रुपये क्‍विंटलने

Agrowon Diwali Article: स्त्रियांची शाश्‍वत शेती

SCROLL FOR NEXT