
Ajit Pawar : मागच्या काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी कोल्हापुरात निर्धार सभा घेत जोरदार शक्तीप्रदर्शन केले. दरम्यान याला उत्तर देण्यासाठी काल (ता.१०) हसन मुश्रीफ यांनी कोल्हापुरात उत्तरदायित्व सभेचे आयोजन केले होते. या सभेमुळे शहरात मोठ मोठे डिजीटल बोर्ड, बॅनर लावण्यात आले होते. यामुळे उत्तरदायित्व सभेची जोरदार चर्चा रंगली होती.
दरम्यान या कार्यक्रमाचा सभा मंडपही भव्य दिव्य बांधण्यात आला होता. तपोवन मैदान येथे सुरू असलेल्या सभेदरम्यान एका शेतकऱ्याची मात्र जोरदार चर्चा झाली. कृषी मंत्री धनंजय मुंडे बोलायला उभे राहताच एका शेतकऱ्याने आपल्या हातातील बॅनर फडकवला या बॅनरची चर्चा सध्या जोरदारपणे सुरू आहे.
कृषी मंत्री धनंजय मुंडे हे भाषणासाठी उभे राहिले. यावेळी काही शेतकऱ्यांनी पोश्टर हातात धरून उभे राहिले, मी काय अतिरेकी नाही, मी काय गुंड नाही, मी एक शेतकरी आहे. मला शेतकऱ्यांची व्यथा मांडावयाची आहे.
फक्त पाच मिनिटे बोलावयाचे आहे, असा फलक घेऊन कृषिमंत्री धनंजय मुंढे यांचे भाषण सुरू असताना काहीजण उभे राहिले. यावर सभागृहात एकच खळबळ उडाली. यावर तातडीने पोलिसांनी हस्तक्षेप करत तो फलक त्या शेतकऱ्यांकडून काढून घेतला.
पोलिसांनी बॅनर काढून घेतला. परंतु, मंत्र्यांना शेतकऱ्यांची व्यथा ऐकून घेण्यासाठी पाच मिनिट ही नाहीत का? असा सवाल शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे.
दरम्यान काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची दसरा चौकात निर्धार सभा घेण्यात आली होती. या सभेला उत्तर देण्यासाठी अजित पवार गटाचे हसन मुश्रीफ यांनी ही उत्तरदायित्व सभा आयोजित केली होती. अजित पवार कोल्हापुरात दाखल होताच फटाके, फुले उधळून त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले.
अजित पवार बोलत असतानाच खुर्च्या झाल्या रिकाम्या
उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्यातून कोल्हापुरला येत असताना राष्ट्रीय महामार्गावर त्यांचे जंगी स्वागत झाले. दरम्यान त्यांना कोल्हापुरात येण्यासाठी सध्याकाळी ६ वाजले. या उत्तरदायित्व सभेसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक गावातून लोक आले होते.
हा कार्यक्रम सुरू होण्यास वेळ झाला. अशातच अनेक नेत्यांची भाषणे झाली. यामुळे अजित पवार यांच्या भाषणाला वेळ झाला. दरम्यान दुपारपासून ताटकळत बसलेले लोक अजितदादांचे भाषण सुरू असतानाच उठून जाऊ लागले. यामुळे अनेक खुर्च्या रिकाम्या झालेल्या पाहायला मिळाल्या.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.