Neera Canal Agrowon
ताज्या बातम्या

Agriculture Irrigation News : पाटबंधारे विभागाच्या ढिसाळ कारभाराचा शेतकऱ्यांना फटका

इंदापूर तालुक्यातील सणसर-रायते मळा या ठिकाणी नीरा डाव्या कालव्याला पाटबंधारे विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे दुसऱ्यांदा भगदाड पडल्याने ३४ शेतकऱ्यांचे सुमारे ४० एकरांवरील पिकांचे नुकसान झाले आहे.

Team Agrowon

Agriculture Irrigation Bhavaninagar : इंदापूर तालुक्यातील सणसर-रायते मळा या ठिकाणी नीरा डाव्या कालव्याला पाटबंधारे विभागाच्या (Irrigation Department) ढिसाळ कारभारामुळे दुसऱ्यांदा भगदाड पडल्याने ३४ शेतकऱ्यांचे सुमारे ४० एकरांवरील पिकांचे नुकसान (Crop Damage) झाले आहे.

यात चार एकर जमीन खरवडून गेली असून, चार घरांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

सणसर (ता. इंदापूर) येथील रायते मळा या ठिकाणी नीरा डावा कालव्याला मोठे भगदाड पडल्याने हे पाणी येथील जमिनीमध्ये पसरले गेले. पाण्याचा वेग एवढा मोठा होता, की शेतातील मातीही वाहून गेली. पिकांचे नुकसान झाले. त्याचबरोबर अनेक घरांमध्ये पाणी शिरले होते.

या अगोदरही याच ठिकाणी महिनाभरापूर्वी नीरा डाव्या कालव्याला भगदाड पडल्याने हीच परिस्थिती निर्माण झाली होती; परंतु याचा गांभीर्याने पाटबंधारे विभागाने निर्णय घेतला नसल्याने पुन्हा नीरा डाव्या कालव्याला भगदाड पडल्याने शेतीचे नुकसान झाले आहे.

ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे, त्यांचे पंचनामे करण्यात आले आहे. परंतु आम्हा शेतकऱ्यांचा कोणी विचार करीत नसल्याने आतापर्यंत आम्हाला कसलीही मदत मिळालेली नाही. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळणार आहे का, असा प्रश्‍न शेतकरी उपस्थित करीत आहेत.

नीरा डाव्या कालव्याला भगदाड पडल्याने यातून हजारो लिटर पाणी मोठ्या प्रमाणात बाहेर पडल्याने शेतकऱ्यांच्या शेतातून वेगाने वाहत गेले. यात शेतकऱ्यांचा काय दोष आहे.

शेतकरी अगोदरच वेगवेगळ्या संकटांनी ग्रासला असून, कोणत्याही पिकामध्ये शेतकऱ्यांना म्हणावा तसा उत्पन्नाचा मार्ग सापडत नाही. त्यातच पुन्हा या नवीन संकटाने अजूनही या ठिकाणी असलेला शेतकरी अडचणीत सापडला आहे.

याचा विचार करून तालुक्याच्या प्रतिनिधींनी तसेच पाटबंधारे विभागाने या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा विचार करून तातडीने या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकरी आबा कटके केली आहे.

आजी माजी लोकप्रतिनिधींनी दिल्या भेटी :

इंदापूर तालुक्याचे आमदार दत्तात्रेय भरणे तसेच माजी सहकार मंत्री व भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन नुकतीच पाहणी केली. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांचे पंचनामे करण्याची व त्यांना तातडीने नुकसान भरपाई मिळावी, अशा सूचना दिल्या आहेत.

नाल्याला भगदाड पडल्यामुळे ३४ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे केले आहे. यात जमिनीचे, तसेच काही प्रमाणात घरांचे नुकसान झाले आहे.
- गोरख बारवकर, तलाठी, सणसर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disability Certificate Verification: दिव्यांग प्रमाणपत्राची टक्केवारी चाळीस टक्क्यांपेक्षा पेक्षा कमी

Summer Irrigation: उन्हाळी सिंचनातून हजारो हेक्टरला दिलासा

MLA Sanjay Puram: धान खरेदीचे उद्दिष्ट वाढविण्याची मागणी

Radhakrishna Vikhe Patil: नांदूर मध्यमेश्वरला शेती नापीक होण्याच्या प्रश्नावर करणार उपाय

Minor Irrigation Tax: पाटबंधारे विभागाने तातडीने ‘मायनर कर’ वसुली थांबवावी

SCROLL FOR NEXT