Cotton Cultivation Agrowon
ताज्या बातम्या

Cotton Cultivation : एक हजार एकरांवर होणार अतिसघन पद्धतीने कापूस लागवड

Cotton Sowing : केंद्र सरकारच्या कृषी मंत्रालयाच्या माध्यमातून देशांतर्गत कापसाची प्रति एकरी उत्पादकता वाढविण्यासाठी अतिसघन कापूस लागवडीचा पथदर्शी प्रकल्प राबविला जात आहे.

Team Agrowon

Nagpur News : केंद्र सरकारच्या कृषी मंत्रालयाच्या माध्यमातून देशांतर्गत कापसाची प्रति एकरी उत्पादकता वाढविण्यासाठी अतिसघन कापूस लागवडीचा पथदर्शी प्रकल्प राबविला जात आहे. वर्धा व नागपूर जिल्ह्यांत एक हजार एकरांवर हा प्रकल्प राबविण्यात येत असून, प्रकल्पातील सहभागी शेतकऱ्यांना कापूस बियाण्याचे वितरण करण्यात आले.

देशांतर्गत कापसाचे १३० लाख हेक्‍टर क्षेत्र आहे, त्यातील सर्वाधीक ४० लाख हेक्‍टर महाराष्ट्रात, तर १८ लाख विदर्भात लागवडीखालील क्षेत्र आहे. जागतिक स्तरावर कापसाखालील क्षेत्र अधिक असले तरी उत्पादकता तुलनेत कमी आहे. ही बाब लक्षात घेता अतिसघन कापूस लागवड प्रकल्पाच्या माध्यमातून उत्पादकता वाढीचा प्रयत्न केला जाणार आहे.

महाराष्ट्राच्या कापूस उत्पादकपट्ट्यात विविध संस्थांच्या माध्यमातून याची अंमलबजावणी होणार आहे. वर्धा व नागपूर या दोन जिल्ह्यांत कॉन्फडेरेशन ऑफ इंडियन टेक्स्टाइल इंडस्ट्रीज कॉटन डेव्हलपमेंट अँड रिसर्च असोसिएशनच्या माध्यमातून प्रकल्प राबविला जात आहे. यामध्ये कापूस झाडांची एकरी संख्या वाढणार आहे. त्या पार्श्‍वभूमीवर प्रकल्पातील शेतकऱ्यांना कापूस बियाण्यांचे वाटप करण्यात आले.

मोहगाव (ता. हिंगणा) येथे हा कार्यक्रम पार पडला. या वेळी सरपंच प्रमोद डाखरे, तालुका कृषी अधिकारी दीपा कुंभार, केंद्रीय कापूस संशोधन संस्थेचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. मनिकंडन, राज्य समन्वयक गोविंद वैराळे, सीटीसीआरएचे आशिष बिसेन, जगदीश नेरलवार, वर्षा काळे यांची उपस्थिती होती. या वेळी कापूस उत्पादकता व व्यवस्थापन याविषयी शेतकऱ्यांना माहिती देण्यात आली. पेरणीयोग्य पाऊस झाल्यानंतरच लागवडीचे नियोजन करण्याचे आवाहन करण्यात आले.

...असे आहे लागवड अंतर

दोन ओळींतील अंतर ९० सेंमी (३ फूट) तर दोन झाडांतील अंतर १५ सेंमी (६ इंच) राहणार आहे. त्यानुसार एका हेक्‍टरमध्ये ७४ हजार झाडे राहतील. या लागवड पद्धतीत हेक्‍टरी १५ बियाण्यांचे पाकीट (सहा पाकिटे एकरी) लागणार आहेत. पारंपरिक लागवड पद्धतीच्या तुलनेत यामध्ये हेक्‍टरी ३० टक्‍के उत्पादनात वाढ होईल, असा दावा करण्यात आला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ujani Floating Solar Project: उजनी जलाशयावर केवळ नऊ टक्के क्षेत्रावरच ‘फ्लोटिंग सोलार’ प्रकल्प; जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांचे स्पष्टीकरण

Wild Boar Attack: शेतशिवारात रानडुकरांचा हैदोस; कपाशी पिकाचे नुकसान

Drought Management: बांधबंदिस्ती, जलसंधारण, पीक नियोजनानेच दुष्काळावर मात शक्य; पोपटराव पवार

Ahilyanagar District Bank Election: अहिल्यानगरला जिल्हा बॅंकेच्या दहा जागांसाठी उद्या मतदान; एकूण सत्तावीस उमेदवार; मंगळवारी मतमोजणी

Maize Trading: चांदूरबाजारमध्ये मक्याची उलाढाल वाढली

SCROLL FOR NEXT